Home » Navneet Rana : चर्चेला पूर्णविराम नवनीत राणा भाजपाच्या वाटेवर

Navneet Rana : चर्चेला पूर्णविराम नवनीत राणा भाजपाच्या वाटेवर

Devendra Fadnavis : राणा यांची उपमुख्यमंत्री फडणवीस सोबत भेट

by नवस्वराज
0 comment

Nagpur : लोकसभा निवडणुक आचारसंहितेची घोषणा उद्या होऊ शकते. सर्वच पक्षांमध्ये उमेदवार घोषीत करण्याची लगबग सुरु आहे.  अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा भाजप मध्ये प्रवेश होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या नंतर नवनीत राणा यांचे नाव पुन्हा आज चर्चेत आले आहे. नागपूर येथे आमदार रवी राणा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. नवनीत राणा लवकरच भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत रवी राणा यांनी दिले आहेत. येत्या दोन दिवसांत मोठी राजकीय घडामोड घडेल. भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला एक प्रस्ताव दिला असेही त्यांनी स्पष्ट केले.

लवकरच युवा स्वाभिमान पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक होणार असून त्यात महत्त्वाचा निर्णय होणार आहे. नवनीत राणा युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्याध्यक्ष आहेत, कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन त्या भाजप कडून निवडणूक लढवतील असे संकेत रवी राणा यांनी दिले आहेत.

मी काल रात्री देवेंद्र फडणवीस आणि रवी राणा यांच्यात झालेल्या चर्चेत सहभागी नव्हती. असे नवनीत राणा यांनी सांगितले. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल एकच सांगते, ते नेहमी माझ्या सोबत राहतील. मी कमळावर लढणार की नाही हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि रवी राणा हे ठरवतील. कारण आई वडिलांवर शंका करणे हे चुकीचेच आहे. जर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी ठरवले तर मी शंका घेण्याचे कारणच नाही असे नवनीत राणा म्हणाल्या. पक्षाकडून सकारात्मक प्रतिसाद दिला जाईल. बैठकीत या प्रस्तावा बाबत चर्चा झाली आहे. त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल असे नवनीत राणा यांनी सांगितले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!