Home » Lok Sabha Election : ‘नवस्वराज’चे वृत्त खरे ठरले; अकोल्यातून नाना पटोले आंबेडकरांना म्हणाले..

Lok Sabha Election : ‘नवस्वराज’चे वृत्त खरे ठरले; अकोल्यातून नाना पटोले आंबेडकरांना म्हणाले..

Akola Constituency : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले अद्यापही वेळ गेलेली नाही

by नवस्वराज
0 comment

Congress on Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीत बिघाडी झाल्यानंतर आंबेडकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अकोल्यात पत्रकार परिषद घेत आंबेडकरांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आंबेडकरांच्या या आरोपांनंतर नाना पटोले यांनी गुरुवारी (ता. 04) त्यांना उत्तर दिले. काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नाना पटोले अकोल्यात आले होते.

अकोल्यात पटोले यांनी पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांच्यापुढे मैत्रीचा हात पुढे केला आहे. महाविकास आघाडीसोबत एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी आंबेडकरांना केले आहे. नाना पटोले हे प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी सकारात्मक असल्याचे पटोले यांच्या वक्तव्यावरून दिसत आहे. मतांचे विभाजन टाळण्यासाठी आपण ‘वंचित’कडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. ‘वंचित’ला अकोल्याच्या जागेसाठी आपण खुले आवाहन केले आहे. आपल्याला निदान दोन जागेचा प्रस्ताव सांगावा, त्यासाठी आपली तयारी आहे. ‘वंचित’ने अकोल्यात अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे कोणत्या मतदारसंघात माघार घ्यावी हे आंबेडकरांनी स्पष्ट करावे, असेही पटोले म्हणाले.

अजून वेळ गेलेली नाही. आंबेडकरांसाठी दोस्तीचा हात पुढे आहे. त्यांनी आताही निर्णय घ्यावा असे आवाहन नाना पटोले यांनी केले. प्रकाश आंबेडकर हे आपल्यावर टीका करतात आपण ते सहनही करतो. केवळ देशाचे संविधान वाचविण्यासाठी आंबेडकरच टीका करतात असे नाही तर ‘वंचित’चे पदाधिकारीसुद्धा आपल्यावर आरोप का करत आहेत, हे अजूनही समजलेले नाही. आंबेडकरांनी नागपुरात काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा का दिला? हे वेळ आल्यावर सांगेल, असेही पेटोले म्हणाले.

‘नवस्वराज’चे वृत्त खरे ठरले

Lok Sabha Election : महाविकास आघाडी, ‘वंचित’चे फाटले; अभय पाटील यांना उमेदवारी

अकोला लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत सहभाग राहावा यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू राहणार असल्याचे वृत्त ‘नवस्वराज’ने दिले होते. अगदी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या क्षणापर्यंत ही वाटाघाटी सुरू राहिल असे ‘नवस्वराज’ने स्पष्टपणे आपल्या यापूर्वी प्रकाशित बातमीत नमूद केले होते. ‘नवस्वराज’चे हे वृत्त खरे ठरले आहे. प्रकाश आंबेडकर आणि डॉ. अभय पाटील या दोघांनीही सध्या स्वतंत्रपणे अर्ज दाखल केलेले असले तरी नाना पटोले यांनी दिलेल्या पर्यायावरून कदाचित आंबेडकर काँग्रेसला अकोल्यातून अर्ज मागे घेण्याबद्दल सांगू शकतात अशी दाट शक्यता आहे. असे झाल्यास अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांची बाजू भक्कम होणार आहे. अखेरच्या क्षणी नाट्यमय घडामोडींनंतर चित्र सुस्पष्ट होणार आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!