भूषण इंदोरिया
Murder News : धारदार शस्त्राने डोक्यावर जोरदार वार करीत एका युवकाची हत्या करण्यात आली. अकोला शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील जुना केरोसीन डेपो जवळ ही घटना घडली. युवकाचा मृतदेह निर्मनुष्य जागी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. (Murder of Youth in Akola near Railway Station)
मनोज कामेल्लू असे मृतकाचे नाव आहे. तो शहरातील दुबेवाडी येथील राहणारा आहे. मनोज कामेल्लू मित्रांसोबत मद्यप्राशन करीत होता. त्यावेळी त्याचा वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने त्याची हत्या करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला अवघ्या दोन तासात ताब्यात घेतले.