Home » MSEDCL News : महावितरणचे कंत्राटी कार्मचारी संपावर

MSEDCL News : महावितरणचे कंत्राटी कार्मचारी संपावर

Protest In Maharashtra : 45 हजार जागांचा तिढा सोडविण्याची मागणी

by नवस्वराज
0 comment

Nagpur : राज्यात अनेक भागात तापमान वाढत असताना कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या संपाने वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्यातील महावितरण, महानिर्मिती, महापारेषणमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी, महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी नुकतेच दोन दिवस संप केला होता. संपावर जाऊनही कोणीही मागणीकडे लक्ष देत नसल्याने हे कर्मचारी 4 मार्चच्या मध्यरात्रीपासून पुन्हा बेमुदत संपावर गेले आहेत. विदर्भाचे वीज कर्मचारी सुद्धा या संपात सहभागी झाले आहेत.

महापारेषण, महावितरण व महानिर्मिती या कंपन्यांमध्ये अंदाजे 42 हजार कंत्राटी कर्मचारी आहेत. वीज कंपन्या आणि शासनाकडून कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे सरकार आणि कर्मचाऱ्यांची कृती समिती आमने-सामने आले आहेत. या दोघांमध्ये वादाचे वातावरण निर्माण होऊ शकते. वीज यंत्रणा विस्कळीत होऊन सर्वसामान्य व्यक्ती यामध्ये भरडला जाण्याचा धोका आहे. कंत्राटी कर्मचारी 28 आणि 29 फेब्रुवारीला संपावर गेले होते. कर्मचाऱ्यांनी शासन आणि तीनही कंपन्यांच्या प्रशासनाला मागण्या मान्य न झाल्यास 5 मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा देखील नोटीसद्वारे देण्यात आला होता. तरीही कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले गेले नाही.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात 1 एप्रिलपासून 30 टक्के वाढ करून द्यावी. कामगारांना वयाच्या 60 वर्षापर्यंत कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार द्यावा. स्थायीप्रमाणे कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतनाची मागणी. तीनही वीज कंपनीतील रिक्त पदांवर कंत्राटी कामगारांना सामावून घ्या. कर्मचाऱ्यांकडून सातत्याने तीनही वीज कंपन्यांतील रिक्त पदांवर कंत्राटी कामगारांना सामावून घ्या, हे कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत तेथे नियमित पदभरती करू नका यासह इतर मागण्यादेखील केल्या जात आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!