Nagpur : छत्तीसगढच्या बलरामपूर जिल्ह्यातील दहाव्या वर्गात शिकणारी अल्पवयीन विद्यार्थीनी दुपारी आपल्या आजोबासोबत बाजारात सामान खरेदीसाठी गेली होती. आजोबा सलूनमध्ये गेले तर मुलगी बाजारात सामान खरेदी करत असतांना, एका लाल रंगाच्या कार मधून आलेल्या अपहरणकर्त्यांनी मुलीला जबरदस्ती चार मध्ये कोंबले. मुलीला त्यांनी गुंगी आणणारी औषधी दिल्यामुळे ती बेशुद्ध झाली. नरसिंहपूर या गावाजवळ ती शुद्धीवर आली. नरसिंहपूर रेल्वे स्थानकावरून तीने अपहरणकर्त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करुन करून घेतली. मिळेल त्या रेल्वे गाडीने ती नागपूरला पोहोचली.
आजोबासोबत बाजारात गेलेली मुलगी दिसत नसल्यामुळे कुटूंबीयांनी नरसिंहपूर पोलिस ठाणे गाठत, मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केल्यावर, तांत्रिक आधारावर शोध घेतला असता मुलीचा ठावठिकाणा नागपूर रेल्वे स्थानक असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आरपीएफचे (RPF) वरिष्ठ सुरक्षा आयुक्तांना माहिती देत बेपत्ता मुलीचे छायाचित्र मोबाअलवर पाठविण्यात आले. त्यानंतर शोध घेण्यात आला. त्यावेळी मुलगी फलाट क्रमांक आठवर भयभीत अवस्थेत बसलेली आढळली. मुलीची विचारपूस करून तिला रेल्वे पोलिस ठाण्यात आणण्यात आले. उपनिरीक्षक प्रियंकासिंह यांनी ‘चाइल्ड हेल्पलाइन’च्या प्रतिनिधींसाबेत चौकशी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळविले.’ ‘चाइल्ड हेल्पलाइन’च्या प्रतिनिधींच्या मदतीने मुलीला छत्तीसगड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. आरपीएफ पथकाच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला.