Home » वडील आजारी पडले तेव्हा साधी विचापूसही नाही : अभिजित अडसूळ

वडील आजारी पडले तेव्हा साधी विचापूसही नाही : अभिजित अडसूळ

by नवस्वराज
0 comment

अमरावती : शिवसेनेने खूप काही दिले मान्य आहेच परंतु माजी खासदार व माझे वडील आनंदराव अडसूळ जेव्हा चौकशिच्या ससेमिऱ्यामुळे अडचणीत सापडले तेव्हा पक्षाने तर मदत केली नाहीच पण ते आजारी पडले तेव्हा ‘मातोश्री’तून साधी विचारपूसही झाली नाही, अशा शब्दात माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी आपली नाराजी अधोरेखित केली.

केंद्रीय तपास यंत्रणांचा त्रास, खासदार नवनीत राणा-आमदार रवी राणा प्रकरण आदी कोणत्याही मुद्द्यावर शिवसेनेने माजी खासदार अडसूळ यांना मदत केली नाही. अडसूळ आजारी पडले तेव्हा माणुसकी म्हणूनही ‘मातोश्री’ने विचारले नाही, मग जुने विश्वासू कार्यकर्ते नाराज होणार नाही का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!