Home » अकोल्यातील नाले सफाई पावसाळ्यापूर्वी व्हावी

अकोल्यातील नाले सफाई पावसाळ्यापूर्वी व्हावी

by नवस्वराज
0 comment

अकोला : पावसाळ्याच्या आधी शहरातील १२० व हद्दीवाढ झालेल्या क्षेत्रातील नाल्यांची स्वच्छता करण्याची मागणी भाजपाचे अकोला महानगर अध्यक्ष तथा माजी महापौर विजय अग्रवाल यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी अकोला मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांना दिले आहे.

पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई मोहिम युद्धस्तरावर करणे गरजेचे आहे. ही नालेसफाई झाल्यास पावसाळ्याचे पाणी नागरिकांच्या घरात जाणार नाही याची दक्षता मनपा प्रशासनाला घेता येईल, अशी सूचना अग्रवाल यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
शहरातील हद्दवाढ क्षेत्रासह १२० मोठे नाले आहेत. छोट्या नाल्यांची संख्या जवळपास ८६ आहे. पावसाळ्यात अनेक भागांमध्ये पाणी नाल्यावरून वाहुन जाते. त्यामुळे नागरिकांच्या घरात हे पावसाचे पाणी शिरते. परिणामी अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण होते.

आतपर्यंत या नाल्यांचे पाणी अनेकदा लोकांच्या घरात शिरले आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. या प्रकाराची पुनरावृत्ती टाळता यावी, यासाठी ७ जूनच्या आधी मनपा प्रशासनाने युद्धस्तरावर नालेसफाईचे काम सुरू करावे. याशिवाय शहरात डासांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याकडे सुद्धा मनपा प्रशासनाने लक्ष देऊन नागरिकांचा आरोग्य बिघडणार नाही यासाठी फवारणी व धुरळणी सुरू करावी अशी मागणी भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!