Home » Amravati Firing : भररस्त्यावर मिनीबसवर गोळीबार

Amravati Firing : भररस्त्यावर मिनीबसवर गोळीबार

Police Action : ‘सिनेस्टाईल’ घटनेमध्ये चार जखमी

by admin
0 comment

Tiosa : बोलेरोमधून आलेल्‍या अज्ञात हल्‍लखोरांनी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्‍या समाधीचे दर्शन घेऊन नागपूर येथे परत जात असलेल्‍या नागरिकांच्‍या खासगी प्रवासी मिनीबसवर ‘सिनेस्टाईल’ने गोळीबार केला. यात चार जण जखमी झाले आहे. अमरावती-नागपूर राष्‍ट्रीय महामार्गावर रविवारी मध्‍यरात्रीच्‍या सुमारास शिवणगाव नजीक ही थरारक घटना घडली. हल्‍ल्‍याचे कारण अजून पर्यंत कळू शकले नाही.

एमएच १४ / जीडी ६९५५ क्रमांकाच्‍या १७ आसनी टेम्‍पो ट्रॅव्‍हलरमधून नागपूर येथील भाविक रविवार 10 मार्च रोजी शेगाव येथे दर्शनासाठी गेले होते. सायंकाळी दर्शन आटोपून परतीच्‍या प्रवासाला निघाले असता, अमरावतीहून नागपूरकडे जात असताना, शिवणगाव टोलनाक्‍याच्‍या जवळ नागपूर कडून येत असलेल्‍या एका बोलेरो वाहनाने दिशा बदलून भाविकांच्‍या वाहनाचा पाठलाग सुरू केला. काही वेळाने बोलेरो वाहन समोर गेले, आणि त्या वाहनातील हल्‍लखोरांनी भाविकांच्या वाहनावर गोळीबार सुरू केला. त्यातील एक गोळी टेम्‍पो ट्रॅव्‍हलरचे चालक खोमदेव कवडे यांच्‍या हाताला स्‍पर्श करून गेल्‍याने ते जखमी झाले. चालकासह चार जण या हल्‍ल्‍यात जखमी झाले आहेत.

हल्‍लेखोरांनी गोळीबार केल्‍यानंतर आपले वाहन वळवून मोर्शीच्‍या दिशेने पलायन केले. टेम्‍पो ट्रॅव्‍हलरचे जखमी चालक खोमदेव कवडे यांनी प्रसंगावधान राखून वाहन रस्‍त्‍यात कुठेही न थांबवता थेट तिवसा पोलीस ठाण्‍यात आणले. त्यांनी घटनेची सविस्तर माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी जखमींना प्राथमिक उपचारासाठी रुग्‍णालयात नेले आणि लगेच नियंत्रण कक्षाला कळविले. बोलेरो वाहनातून आलेल्या हल्लेखोरांच्या तोंडाला दुपट्टे बांधलेले असल्याची, माहिती वाहनातील भाविकांनी पोलिसांना दिली. या हल्‍ल्‍यामागील कारणाचा तसेच हल्‍लेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!