Home » सदोष मिटर वाचनाचा वीज ग्राहकांना आर्थिक फटका

सदोष मिटर वाचनाचा वीज ग्राहकांना आर्थिक फटका

by नवस्वराज
0 comment

अकोला : महावितरण कंपनी तर्फे अधिकृत वीज पुरवठा करण्यात आलेल्या ग्राहकांना मिटर वाचनाप्रमाणे देयक प्राप्त व्हावे म्हणून त्यांनी वीज पुरवठा घेतलेल्या ठिकाणी मिटर बसवले जाते. मिटरची ०५ वर्षांची हमी (ग्यारेंटी) असते. त्यानंतर मिटर मधे दोष निर्माण होऊ शकतो. बर्याच ग्राहकांच्या मिटरचा हमी कालावधी संपलेला आहे.

जुन २०२३ मधे अकोला जिल्ह्यात वीज ग्राहकांची एकूण संख्या ३७२६५९ ईतकी आहे. ०८.०२ % ग्राहकांना सदोष मिटर (फाॅल्टी) चे सरासरीची देयके प्राप्त झाली आहेत. कंपनी तर्फे केवळ ०.३०% मिटर बदलविण्यात आले आहेत.

कुलूपबंद, मिटर वाचन घेतले नाही, अशी सरासरीने आकारणी करण्यात आलेल्या देयकांच्या रक्कमचे, मिटर वाचन उपलब्ध झाल्यावर पुढील देयकात समायोजन देण्यात येते, संगणकीय प्रणालीत तशी तरतुद केली आहे, फाॅल्टी बाबत तशी तरतुद नाही. त्यामुळे ग्राहकांना निष्कारण आर्थिक भुर्दड सहन करावा लागतो, फाॅल्टीचे बील प्राप्त झाल्यास दुरूस्ती करून घेण्यासाठी तक्रार करून कार्यालयात हेलपाटे घ्यावे लागतात. कंपनीने प्राथमिकतेने फाॅल्टी मिटर बदलावे तसेच सर्वेक्षण करून हमी कालावधी (ग्यारेंटी पीरियड) संपलेले मिटर देखील टप्याटप्याने बदलावेत, जेणेकरून वीज ग्राहकांना त्रास होणार नाही, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा अकोलाचे, वीज ग्राहक संघ प्रमुख मंजीत देशमुख यांनी केली असल्याचे प्रसिद्धी प्रमुख विजय केंदरकर व मिलिंद गायकवाड यांनी कळवले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!