नवी दिल्ली : देशातील निम्म्यावर ऊर्जा निर्मिती केंद्रांत कोळशाचा तुटवडा आहे.
जगातील ३० देशांमध्ये व्याप असलेल्या ‘नोमुरा’ने तसा अहवाल सादर केला आहे. या अहवालात देशातील वीज निर्मिती केंद्रात असलेल्या कोळशाचा उल्लेख करण्यात आला आहे. कोळशाच्या टंचाईमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये भारनियमनाचे व वीज निर्मितीचे संकट निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Myth vs Facts https://t.co/YutjiT8FFJ
Coal supply to Power Plants of Maharashtra enhanced to 2.76 lakh ton per day (till April 11, 2022) from 2.14 lakh ton in March, 2022.
During the fiscal 2021-22 coal supply to power plants of the State touched 70.77 Million Ton. pic.twitter.com/aKzhbMlvJE— PIB_Coal (@PIB_Coal) April 17, 2022
कोल इंडियाने मात्र कोळशाच्या टंचाईचा हा दावा फेटाळला आहे. एक महिना पुरेल इतक्या प्रमाणात कोळसा देशात उपलब्ध असल्याचे कोल इंडियाने म्हटले आहे. अहवालाच्या नुसार देशातील १७३ पैकी १०० ऊर्जा निर्मिती केंद्रात पुरेसा कोळसा नाही. निर्धारित क्षमतेपेक्षा २५ टक्केच कोळसा सध्या उपलब्ध आहे. सध्या वीज निर्मिती धोक्यात असल्याने महाराष्ट्रात भारनियमनाचे संकट आहे. केंद्र सरकारने याबाबत खुलासा करीत एप्रिल २०२२ पर्यंत २.७६ लाख टन कोळसा महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्रांना पुरविण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. मार्च २०२२ मध्ये हाच पुरवठा २.१४ लाख टन प्रती दिवस होता.