अकोला : अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्यावतीने ११ सप्टेंबर रोजी भाऊसाहेब लहाने सभागृहात ‘द्विग्विजय दिन’ साजरा करण्यात आला.
१८९३ मध्ये शिकागोत आयोजित धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी जे अविस्मरणीय भाषण दिले, त्याची स्मृती म्हणून अकोला जिल्हा ग्राहक पंचायततर्फे दरवर्षी ‘द्विग्विजय दिन’ साजरा करण्यात येतो. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ श्रीनिवास खोत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला संघ सचिव अॅड. पूनम देशपांडे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मंचावर अॅड श्रीनिवास खोत, हेमंत जकाते, दिनेश पांडे, सुधाकर जकाते, मनोहर गंगाखेडकर उपस्थित होते.
ग्राहक गीत सचिव मनोज अग्रवाल यांनी सादर केले. प्रास्ताविक जिल्हा संघटनमंत्री हेमंत जकाते यांनी केले. अॅड खोत यांनी आपल्या भाषणात, ग्राहक पंचायतच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, विवेकानंद अनाकलनीय आहेत. भारताचे नाव, संस्कृती, ईतिहास जगात पोहोचविण्याचे कार्य स्वामी विवेकानंदांनी केले. स्वामीजी सर्व जगाला आपले कुटुंब मानत. धर्म पालनावर त्यांचा कटाक्ष होता, कारण धर्म सुसंस्कृत करतो, असा त्यांचा दृढ विश्वास होता. बुद्धीमान, शक्तीमान, गतीमान व्हा, असा मंत्र त्यांनी सर्वांना दिला.
अध्यक्षीय भाषणात सुधाकर जकाते यांनी मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन अध्यक्ष दिनेश पांडे यांनी केले. जास्तीत जास्त लोकांनी वार्षिक ऑनलाईन सदस्य व्हावे,असे आवाहन त्यांनी केले. सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष विनोद मेहरे, पेट्रोल व गॅस संघाचे सचिव प्रमोद बोरकर यांनी परिश्रम घेतले, असे प्रसिद्धी प्रमुख विजय केंदरकर व मिलिंद गायकवाड यांनी कळविले आहे.