Crime News : अकोला शहरातील कलम 55 मुंबई पोलिस अधिनियम अंतर्गत हद्दपार करण्यात आलेल्या टोळीला विभागीय आयुक्त अमरावती यांनी पोलिस अधीक्षक अकोला यांचे दोन वर्ष हद्दपारीचे आदेश कायम ठेवला .
अकोला जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी सर्व सामान्य नागरिकांना दैनंदिन जीवन भयमुक्त वातावणात जगता यावे याकरीता पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील पोलिस स्टेशन सिव्हिल लाइन्स हद्दीतील इसम नामे शेख कासम शेख शेखजी (वय 31 वर्ष), शेख अयाज उर्फ भोलु शेख शेखजी (वय 30 वर्ष) दोघेही राहणार चांदखाँ प्लॉट, जुने शहर, अकोला यांना 02 नोव्हेंबर 2023 रोजी दोन वर्षाकरीता अकोला जिल्हयातुन हद्दपार केले होते.
हद्दपार आदेशाविरुद्ध नमूद दोन्ही इसमांनी विभागीय आयुक्त अमरावती यांच्या कार्यालयात अपिल दाखल केले होते. अपिल अर्जावर विभागीय आयुक्त अमरावती यांनी अंमित सुनावणी घेवून पोलिस अधीक्षक अकोला यांचा 02 नोव्हेंबर 2023 रोजीचा दोन वर्षांकरीता हद्दपारीचा आदेश कायम ठेवला आहे.
अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहुन शांतता राहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर येणाऱ्या निवडणूक, आगामी सण, उत्सव काळात एमपीडीए व इतर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिला आहे.