Home » Lok Sabha Elections 2024 : माजी काँग्रेस आमदार दिलीप सानंदा भाजपच्या वाटेवर?

Lok Sabha Elections 2024 : माजी काँग्रेस आमदार दिलीप सानंदा भाजपच्या वाटेवर?

Bjp on Congress : लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची काँग्रेसच्याच एका पदाधिकाऱ्याची माहिती

0 comment

Khamgaon : काँग्रेसचे मोठे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. तीन वेळा बुलढाण्या जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिलेले दिलीप सानंदा हे देखील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दिलीप सानंदा हे गेल्या अनेक दिवसापासून भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने दिली आहे. दिलीप सानंदा हे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत.

दिलीप सानंदा हे दिवंगत विलासराव देशमुख यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जात होते. मात्र विलासराव देशमुख यांचे निधन झाल्यापासून पक्षात त्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याचेही बोलले जात आहे. दिलीप सानंदा यांनी 1999 मध्ये खामगाव विधानसभेची निवडणूक लढवली तेव्हापासून ते सलग 2009 पर्यंत तीन वेळा काँग्रेस चे आमदार राहिले आहेत. मात्र 2014 मध्ये भाजपचे आकाश फुंडकर यांनी त्यांचा पराभव केला. 2019 मध्ये त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. राहुल गांधी यांची पहिल्या टप्प्यातील भारत जोडो यात्रा ही बुलढाणा जिल्ह्यातून गेली त्यावेळी दिलीप सानंदा यांनी सक्रिय सहभाग नोंदवला नसल्याचा ठपकाही काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर ठेवला होता. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पक्षात निष्क्रिय झालेले दिलीप सानंदा हे आता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

मी सध्या मुंबईत अमित शाह यांची भेट घेणार आहे. जे काही बोलले जात आहे, त्यात तथ्य आहे. लवकरच पूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

– दिलीप सानंदा 

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!