Home » Lok Sabha Election : नागपूरच्या डीसीपीची पुन्हा बदलीसाठी तक्रार

Lok Sabha Election : नागपूरच्या डीसीपीची पुन्हा बदलीसाठी तक्रार

IPS Archit Chandak : आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कार्यवाही न केल्याचा ठपका

by admin
0 comment

Nagpur News : नागपूर शहर पोलिस दलात कार्यरत असलेले सायबर उपायुक्त अर्चित चांडक यांची पुन्हा बदलीसाठी तक्रार करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी गृहशहर आणि स्वग्राम असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांची बदली करण्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानंतरही चांडक यांची बदली न झाल्याने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीनंतरही आयोगाने चांडक यांनी बदली न केल्याने पुन्हा एकदा याप्रकरणी दाद मागण्यात आली आहे.

बहुजन वंचित आघाडीचे पूर्व विदर्भ संयोजक प्रफुल्ल माणके यांनी यासंदर्भात नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. नागपूर शहर पोलिस दलातील उपायुक्त अर्चित चांडक यांचे नागपूर हे गृहशहर आहे. त्यांचे शिक्षणही नागपुरातच झाले. त्यामुळे त्यांचे समाजात आणि राजकीय पक्षांसोबत संबंध असल्याची शक्यता नाकारता येत नाही. चांडक हे पोलिस उपायुक्त दर्जाचे अधिकारी आहेत. त्यांच्या अधिनस्थ जवळपास 400 ते 500 पोलिस अधिकारी आणि कर्मचारी आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ते प्रभाव पाडू शकतात, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!