Home » Winter Season : फेब्रुवारीपर्यंत राहणार बोचऱ्या थंडीचा मुक्काम

Winter Season : फेब्रुवारीपर्यंत राहणार बोचऱ्या थंडीचा मुक्काम

Climate Change : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा परिणाम

by नवस्वराज
0 comment

Akola : थंडीने आपला मुक्काम वाढवला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात देखील थंडी कायम असणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडीचा मुक्काम वाढला आहे. महाराष्ट्रात जानेवारी अखेरपर्यंतच थंडी राहील आणि त्यानंतर मात्र तापमानात वाढ होऊन थंडी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल, असा अंदाज होता. आता मात्र थंडीने आपला मुक्काम वाढवला आहे.

सध्या दिवसा हलकेसे ऊन जाणवायला लागले असले तरीही सायंकाळपासून थंडीची चाहूल लागते. पहाटे थंडीत आणखी वाढ होते. विदर्भात मागील आठवड्यात किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षाही कमी झाले होते. आतासुद्धा ते 14 अंश सेल्सिअसच्या आतच आहे. कमाल तापमानात वाढ असली तरी किमान तापमानातील घट कायम आहे. उपराजधानीसह गोंदिया, भंडारा, अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यात किमान तापमानात घट होत आहे. 31 जानेवारीनंतर थंडीत आणखी वाढ होईल असा अंदाज आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा परिणाम राज्यावर आठ फेब्रुवारीपर्यंत कायम राहील.

बाहेरच्या देशातून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव देखील असणार आहे. ही स्थिती अशीच कायम राहिली तर थंडीचा मुक्काम 15 फेब्रुवारीपर्यंत वाढू शकतो. सध्या सकाळच्या वेळी काहीसे ढगाळ वातावरण आहे, पण पावसाची सध्यातरी शक्यता नाही. त्यामुळे पुढील आठवड्यात पण गरम कपड्यांची आवश्यकता भासणार आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!