Home » Lok Sabha Election : गोंदियात पकडली 1.76 कोटींची रोकड

Lok Sabha Election : गोंदियात पकडली 1.76 कोटींची रोकड

Gondia : सोनी तपासणी नाक्याजवळ कारमध्ये ठेवली होती रक्कम

by नवस्वराज
0 comment

Goregaon Soni Check Post : भरारी पथकांनी केलेल्या कारवाईत गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव जवळ असलेल्या सोनी नाक्याजवळ 1 कोटी 76 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला काही दिवस शिल्लक असताना ही कारवाई करण्यात आली आहे. पकडण्यात आलेल्या रकमेबाबत तपास करण्यात येत आहे.

सोनी तपासणी नाक्याजवळ भरारी पथक प्रमुख बाबा शिंदे, सरीता लिल्हारे, विलास सूर्यवंशी, रंजना चानप, रामानंदा दास, श्यामकला भोयर, संदीप पटले यांनी संयुक्त कारवाई केली. गोंदिया येथून डिझायर कारने गोंदिया-ठाणा ते गोरेगावकडे ही रक्कम नेण्यात येत होती. कार मार्गस्थ असताना सोनी तपासणी नाका येथे भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी चालकाला अडविले. त्यावेळी कारची झडती घेण्यात आली.

कारमध्ये 1 कोटी 76 लाख रुपयांची रोकड ठेवण्यात आल्याचे आढळले. तहसीलदार किसन भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करून रक्कम सील करण्यात आली. ईएसएमएस ॲपवरून पंचनामा करण्यात आला. पोलिस निरीक्षक अजय भुसारी व उपनिरीक्षक घोलप यांनी कायदेशीर कारवाई केली. तहसीलदार गोमासे, निवडणूक निर्णय अधिकारी पूजा गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!