Home » Lok Sabha Election 2024 : बुलढाण्यातील शिवसेना पदाधिकारी ठाकरेंच्या भेटीला

Lok Sabha Election 2024 : बुलढाण्यातील शिवसेना पदाधिकारी ठाकरेंच्या भेटीला

Shiv Sena : नरेंद्र खेडेकर, दीपक बुधवत यांची पक्ष प्रमुखांसोबत चर्चा

0 comment

Karanja Lad : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. अशात बुधवारी (ता. 13) बुलढाण्याचे नरेंद्र खेडेकर व जालिंदर बुधवत यांनी तातडीने वाशीम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी या दोघासमवेत बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीवर चर्चा केली. या तातडीच्या भेटीनंतर खेडेकर व बुधवत हे  मेहकरात दाखल झालेत. त्यानंतर खेडेकर यांची लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारी निश्चित झाल्याच्या चर्चांना उधाण आले.

बुलढाणा जिल्ह्यातील विविध राजकीय विषयावर उद्धव ठाकरे यांनी खेडेकर आणि बुधवंत यांच्याशी चर्चा केली. काही दिवसांपूर्वी ठाकरे बुलढाणा जिल्ह्यात आले होते. शेगाव येथे मुक्कामी असताना माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाले. हे वृत्त कळताच ठाकरे यांनी आपला दौरा रद्द करीत जोशी यांच्या अंत्यसंस्कार विधीसाठी हजेरी लावली होती. त्यानंतर आता ठाकरे यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी ठाकरे यांनी मेहकरच्या सभेची संभाव्य तारीख यावरही खेडेकर व बुधवत यांच्याशी चर्चा केली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!