Home » Illegal Liquor Action : गावठी दारूचा मोठा साठा जप्त

Illegal Liquor Action : गावठी दारूचा मोठा साठा जप्त

Crime News : अकोला पोलिसांची निवडणूक काळात चार मोठ्या कारवाई

by admin
0 comment

Akola News : आगामी लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी अकोला जिल्हयातील अवैध दारू विक्री करणारे तसेच गावठी हातभ‌ट्टीवर दारू तयार करून विक्री करणा-यांविरुध्द कारवाई करणे करिता स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील अधिकारी व अंमलदार यांचे पथके गठीत करून त्याबाबतची माहिती घेवुन कारवाई करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पथकांनी गुप्त माहितीवरून धडक कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांनी आचार संहिता काळात जिल्ह्यात वेगवेगळया चार ठिकाणाहून गावठी हातभ‌ट्टीची एकुण 270 लिटर गावठी दारू व 2070 लिटर सडवा मोहमाच असा एकुण 2,55,470 चा मुद्देमाल जप्त केला.

पोलिस स्टेशन उरळ ह‌द्दीमध्ये ग्राम मोरगाव सादिजन येथे 12 एप्रिल 2024 रोजी छापा कारवाई करून आरोपी गजानन महादेव सोळंके वय 40 वर्ष रा. मोरगाव सादिजन ता. बाळापुर जि. अकोला याचे जवळुन 80 लिटर गावठी हातभ‌ट्टीची दारू व सडवा मोहमाच 390 लिटर व ईतर साहित्य असा एकुण 47,000/रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपीला मुद्देमालसह पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलिस स्टेशन उरळ यांचे ताब्यात देण्यात आले.

13 एप्रिल 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांतर्फे तीन छापा कारवाई करण्यात आल्या. पहिल्या कारवाईत स्टेशन चान्नी हद्दीमध्ये ग्राम सस्ती शिवार निर्गुणा नदी पात्र येथे छापा कारवाई केली असता नतीन मोतीराम अंभोरे वय 30 वर्ष रा. ग्राम सस्ती ता. पातुर जि. अकोला याचे जवळुन 75 लिटर गावठी हातभ‌ट्टीची दारू व सडवा मोहमाच 420 लिटर व ईतर साहित्य असा एकुण 49,500/रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला मुद्देमालसह पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलिस स्टेशन चान्नी यांचे ताब्यात देण्यात आले.

दुसऱ्या छापा कारवाईत पोलिस स्टेशन बार्शिटाकळी ह‌द्दीमध्ये ग्राम टिटवा शेतशिवार येथील सुरेश बाळु शिंदे वय 37 वर्ष रा. ग्राम टिटवा ता बार्शिटाकळी जि. अकोला याचे जवळून 15 लिटर गावठी हातभ‌ट्टीची दारू व सडवा मोहमाच 735 लिटर व ईतर असा एकुण 1,13,520/रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपी मु‌द्देमालसह पुढील कायदेशीर कारवाईस्तव पोलिस स्टेशन बार्शिटाकळी यांचे ताब्यात देण्यात आले. तर तिसऱ्या कारवाईत पोलिस स्टेशन अकोट ग्रामीण हद्दीमध्ये ग्राम पोपटखेड जामुन नाला येथे छापा कारवाई केली असता गजानन शंकरलाल साल्फेकर वय 50 वर्ष रा. पोपटखेड ता. अकोट जि. अकोला याचे जवळुन 100 लिटर गावठी हातभट्टीची दारू व सडवा मोहमाच 525 लिटर व ईतर असा एकुण 45,450/रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपीला ताब्यात देण्यात आले.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला, पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव, आशिष शिंदे, पोलीस अंमलदार दशरथ बोरकर, प्रमोद ढोरे, उमेश पराये, गोकुळ चव्हाण, रवि खंडारे, सुलतान पठाण, महेद्र मलिये, विशाल मोरे, खुशाल नेमाडे, अविनाश पाचपोर, वसिमोद्दीन, एजाज अहेमद, अनिल राठोड, लिलाधर खंडारे, धिरज वानखडे, आकाश मानकर, अभिषेक पाठक, मोहम्मद अमीर, अशोक सोनवणे , पोलिस अंमलदार अक्षय बोबडे, प्रशांत कमलाकर, विजय कबले यांनी केली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!