Home » Buldhana News : लाच स्वीकारतांना तहसीलदारास अटक

Buldhana News : लाच स्वीकारतांना तहसीलदारास अटक

Bribe Case : झाडाझडतीत सापडले तब्बल 46 लाखांचे घबाड

by admin
0 comment

Crime News : सिंदखेडराजा येथील तहसिलदार सचिन शंकरलाल जैस्वाल यांना शुक्रवार 12 एप्रिल रोजी लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. त्यांचा बंगला व निवासस्थानातून 46 लाखांची रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून अवैधरित्या वाळू वाहतुक करण्यासाठी त्यांना तहसिलदार सचिन जैस्वाल यांनी 35 हजाराची लाच मागितली. त्यांनी तक्रार केल्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली. त्यात मोठे घबाड हाती लागले. सदर रक्कम जप्त करण्यात आली आहे.

तहसीलदार सचिन जैस्वाल, शिपाई पंजाब ताठे, चालक मंगेश कुलथे यांना 5 हजारांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. यानंतर लाचलुचपत विभागातर्फे वेगाने कारवाई करण्यात आली. बुलढाणा येथील पथकाने जैस्वाल यांच्या सिंदखेडराजा येथील शासकीय निवासस्थानाची झडती घेतली असता, तिथे नोटांचे ढीग हाती लागले. तब्बल 37 लाख 52 हजार रुपयांची रक्कम आढळून आली. परभणी लाचलुचपत विभागातर्फे जैस्वाल यांच्या परभणी येथील घराची झडती घेतली असता तिथे देखील 9 लाख 40 हजाराची रक्कम आढळून आली. पुढील तपासात आणखी मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता असल्याचे विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी बोलून दाखविली. अटक करण्यात आलेल्या तहसीलदार सचिन जैस्वाल यांच्या इतर मालमत्तांचा शोध घेणे सुरू असून, सिंदखेडराजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!