Home » Cooperative Sector : भारतीय विद्युत कामगार सहकारी पतसंस्थेची निवडणूक अविरोध

Cooperative Sector : भारतीय विद्युत कामगार सहकारी पतसंस्थेची निवडणूक अविरोध

Power Sector: अध्यक्षपदी संतोष माहोकार, मंगेश गेडाम सचिव

by नवस्वराज
0 comment

Akola : भारतीय विद्युत कामगार सहकारी पतसंस्थेची निवडणूक सोमवार, 19 जानेवारी रोजी पतसंस्थेच्या सभागृहात अविरोध पार पडली. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले. त्यानंतर पतसंस्थेच्या निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली. निवडणूक अविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले.

पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संतोष माहोकार, उपाध्यक्ष शुभांगी कुळकर्णी, मानद सचिव मंगेश गेडाम, कोषाध्यक्ष रावसाहेब जाधव यांची निवड झाली. संचालक म्हणून अनिल माहोरे, अरुण गायकवाड, शेख अन्सार शेख गफ्फार, गणेश काकने, विवेक फुलंबरकर, आदिती धाराशिवकर, नेहा विखोरे यांची निवड करण्यात आली. यावेळी हेमंत देशपांडे क्षेत्रप्रभारी कामगार महासंघ, हेमंत बंड, दगडू खुळे माजी संचालक, श्रीराम देशपांडे, विवेक तापी ज्येष्ठ मार्गदर्शक, विनोद फुलारी झोन सचिव अकोला कामगार महासंघ, विनोद पाचकवडे, सचिन बिडवई व्यवस्थापक आदी उपस्थित होते. पतसंस्थेच्या अध्यासी अधिकारी अनिता भाकरे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांनी अविरोध निवड झालेले पदाधिकारी आणि संचालक मंडळाच्या नावाची घोषणा केली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!