Akola : अकोल्यात लहान मुलांना चॉकलेटमधून भांग दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकीकडे अमलीपदार्थांमुळे तरुणाईचे जीवन धोक्यात आहे, तर दुसरीकडे अकोल्यात भांगेच्या विक्रीने लहान मुलांच्या आयुष्याशी खेळ केला जात असल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. या घटनेमुळे अकोला जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सामाजिक कार्यकर्ते विनय सरनाईक यांच्या निदर्शनास हा प्रकार आला आहे. सरनाईक हे न्यायालयीन कामानिमित्त अकोला येथे जात असताना त्यांना लहान शालेय विद्यार्थ्यांच्या हातात चॉकलेट दिसले. ते वेगळे असल्याचे जाणवल्याने सरनाईक यांनी चॉकलेटची तपासणी केली. यावेळी त्यांना शाळकरी मुलांच्या हातातील रॅपरमध्ये भांग दिसून आली. हा प्रकार धक्कादायक असून याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देत कठोर कारवाई करावी, अशी मागणीही सरनाईक यांनी केली आहे.