Home » Amravati Political : खासदार राणा, इम्तीयाज जलील यांच्यात संघर्ष जोरावर

Amravati Political : खासदार राणा, इम्तीयाज जलील यांच्यात संघर्ष जोरावर

Navneet Rana : हिंमत असेल निवडणूक लढवून पराभूत करून दाखवा

by नवस्वराज
0 comment

Amravati | : काही दिवसांपूर्वी ऑल इंडिया मजलीस – ए – इत्तेहादूल मुस्लिमानचे (AIMIM) छत्रपती संभाजीनगर येथील लोकसभा सदस्य इम्तियाज जलील यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका केली होती. नवनीत राणा आणि जलील यांच्यातील शाब्दिक संघर्ष चांगलाच रंगला आहे. राणा यांनी अमरावती येथील एका कार्यक्रमात बोलतांना जलील यांना थेट आवाहन दिले आहे. तुमच्यात हिंमत असेल तर माझ्या विरोधात निवडणूक लढवून मला पराभूत करून दाखवा, असे नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

काय म्हणाल्या राणा.

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा म्हणाल्या. “मी संसदेत बोलेले होते की, जर या देशात राहायचे असेल तर, ‘जय श्रीराम’ म्हणावे लागेल. नवनीत राणा यांच्या या वक्तव्यावर इम्तियाज जलील म्हणाले होते की, राणा यांना पराभूत करण्यासाठी आम्ही अमरावतीत येऊ. पण जलील यांच्यासारखे किती आले आणि किती गेले. हिंमत असेल तर जलील यांनी अमरावतीमधून माझ्याविरोधात निवडणूक लढवावी. मला पराभूत करून दाखवावे. ते संभाजीनगर मधून कसे निवडून येतात हे मी बघते. असे खुले आवाहन नवनीत राणा यांनी एआयएमआयएम चे खासदार इम्तियाज जलील यांना अमरावती येथील एका कार्यक्रमात बोलतांना केले आहे. नवनीत राणा यांच्या आवाहनामुळे संघर्षाला नविन वळण लागले आहे. यावर इम्तियाज जलील यांनी प्रखर प्रतिक्रिया दिली आहे.

इम्तियाज जलील काय बोलले.

इम्तियाज जलील म्हणाले मला असे कळले आहे की, राणा या SC प्रवर्गातून निवडून आल्या आहेत. त्यांनी संविधान वाचले आहे अथवा नाही याची मला कल्पना नाही. त्यांना भाजपा कडून तिकिट हवे आहे, म्हणून त्या काही गोष्टी करतात. त्यांना संविधानाचा विसर पडला आहे. त्यात बळजबरीची तरतुद नाही. जलील म्हणाले एक म्हण मला आठवते. ‘इन्सान कितना भी अच्छा क्युँ न हो, कुत्तेसे अच्छा भौंक नही सकता’. हे मी नवनीत राणा यांच्याबद्दल बोलत नाही. पण महिला असून कशी भाषा बोलतात असेही जलील म्हणाले.

लोकसभेत असदुद्दीन ओवैसींनी सांगितले कि, आम्ही पुरुषोत्तम रामाचा आदर करतो, नाथुराम गोडसेंचा नाही. हे लोक गोडसेंच्या प्रवृत्तीचे आहेत. यांना हनुमान चालीसा उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर वाचायची होती. त्यावेळी या महीला ठाकरेंवर टिका करत होत्या. आता ओवैसींवर टिका करत आहेत. सवंग प्रसिद्धी मिळवणार्या अशा महिलांना आम्ही महत्त्व देत नाही. अशी प्रखर प्रत्युत्तर खासदर इम्तियाज जलील यांनी दिले आहे. यामुळे नवनीत राणा आणि इम्तियाज जलील यांच्यातील संघर्ष कुठले नवीन वळण घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!