Home » Akola Police : आणखी एकाविरुद्ध एमपीडीए कारवाई

Akola Police : आणखी एकाविरुद्ध एमपीडीए कारवाई

Lok Sabha Election 2024 : निवडणुकीपूर्वी नववा धोकादायक आरोपी कारागृहात

by admin
0 comment

Akola : अकोला शहरातील जुने शहर भागातील खिडकीपुरा येथील रहिवासी कुख्यात गुंड इमरान खान रहीम खान (वय 29) याला एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आले आहे. इमरानविरुद्ध घातक हत्यारांनी किंवा साधनांनी जबर दुखापत करणे, जबरी चोरी, हल्ला, गृह अतिक्रमण करणे, शांतता भंग करणे, दहशत पसरविणे, दंगल करणे असे गुन्हे दाखल आहेत.

इमरान प्रतिबंधक कारवाईला जुमानत नसल्याने त्याच्या विरुद्ध गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी अजित कुंभार यांना सादर केला. जिल्हादंडाधिकाऱ्यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच इमरानबद्दल माहिती मिळवित तो धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री केली. त्यानंतर त्याला एक वर्षासाठी अकोला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध ठेवण्याचे आदेश दिलेत. जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशावरून इमरान खान रहीम खान याचा शोध घेत पोलिसांनी त्याला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध केले आहे.

पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनात अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, शहराचे पोलिस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, उपनिरीक्षक आशिष शिंदे, कर्मचारी ज्ञानेश्वर सैरीसे, उदय ईश्वरीप्रसाद शुक्ला, जुने शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितीन लेव्हरकर, कर्मचारी संतोष मेंढे, स्वप्नील पोधाडे यांनी हा प्रस्ताव तयार केला. लोकसभा निवडणूक लक्षात घेता गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी असलेल्यांना स्थानबद्ध करण्यात येत आहे. त्यासाठी अकोला पोलिस सध्या जोमाने कामाला लागले आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!