Home » Lok Sabha Election : निवडणुकीसाठी पोलिस यंत्रणेला ‘हाय अलर्ट’

Lok Sabha Election : निवडणुकीसाठी पोलिस यंत्रणेला ‘हाय अलर्ट’

IPS Bacchan Sing : जिल्ह्यात सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याची सूचना

0 comment

Akola Police : लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे, या निमित्याने अकोला पोलिसांनी आढावा बैठक घेतली

Akola Police : लवकरच होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तयारी संबंधाने अकोला जिल्ह्यातील पोलिस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांकडून पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी आढावा घेतला. पोलिस अधीक्षक कार्यालयातील विजय हॉल येथे ही आढावा बैठक घेण्यात आली. आगामी निवडणुकीसंबंधाने तपासणी समितीच्या आदेशानुसार शस्त्रे जमा करून घेण्याची सूचना बच्चन सिंह यांनी सर्व अधिकाऱ्यांना केली. अकोला जिल्ह्यात 533 शस्त्र परवानाधारकांनी आतापर्यंत शस्त्र जमा केले आहे.

निवडणूक संबंधाने पकड वॉरंट, फरार आरोपींसाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. जिल्ह्यात 238 पकड वॉरंटवर कारवाई करण्यात आली. एका फरार आरोपीला अटक करण्यात आली. एकूण 49 अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यात आली. अवैध दारू विक्री थांबविण्यासाठी मोहिम राबवत 563 केसेस करण्यात आल्या आहेत. निवडणूक अनुषंगाने जिल्ह्यातील सिमेवर 09 चेकपोस्ट लावण्यात आले आहेत. बेकायदेशीर कृत्य रोखण्यासाठी एफएसटी 24, एसएसटी 17 आणि क्युआरटी 02 पथके नेमण्यात आली आहेत.

उत्सव आणि निवडणूक बंदोबस्त

सण उत्सव व निवडणूकदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टिकोणातून सिमा सुरक्षा दलाच्या तुकडीसह एकुण चार ठिकाणी ‘रूट मार्च’ करण्यात आला राज्य राखीव पोलिस बलाच्या दोन कंपनी व अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी करण्यात आली आहे. जातीयवादी रिपोर्ट वरून 65 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. इतर प्रकरणांमध्ये 982 जणांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी जिल्ह्यात गावभेट, ‘कॉर्नर मिटिंग’ही सुरू केल्या आहेत. बैठकीनंतर फेब्रुवारीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 64 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देवून बच्चन सिंह यांनी गौरवही केला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!