Home » ग्राहक पंचायतची पातूर कार्यकारिणी घोषित

ग्राहक पंचायतची पातूर कार्यकारिणी घोषित

by नवस्वराज
0 comment

अकोला : पातूर येथील ग्रमीण आयुर्वेद महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या पातूर तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.

यावेळी मंचावर जिल्हा संघटनमंत्री हेमंत जकाते, दिनेश पांडे अध्यक्ष, मनोज कुमार अग्रवाल सचिव, मंजित देशमुख वीज ग्राहक संघ प्रमुख तसेच प्रमोद बोरकर सचिव गॅस, पेट्रोल ग्राहक संघ होते. ग्राहक गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर मंचावरील उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दिनेश पांडे यांनी सर्वानुमते निवडण्यात आलेल्या पातूर तालूका कार्यकारीणीची घोषणा केली. देवानंद गहीले तालूका अध्यक्ष, श्रीकांत बोरकर तालूका संघटनमंत्री, डाॅ. प्रशांत निकम सह संघटनमंत्री, श्रीमती भारती गाडगे उपाध्यक्ष, संदीप गिर्हे सचिव, नारायणराव अंधारे सहसचिव, डॉ. शांतीलाल चव्हाण कोषाध्यक्ष, सुहास देवकर सहकोषाध्यक्ष, प्राध्यापक करूणा गवई तालूका महिला प्रमुख, कृष्णराव गाडगे संपर्क प्रमुख, प्रेमचंद शर्मा प्रसिद्ध प्रमुख, प्राध्यापक  वसंतराव गाडगे, ज्योती दाभाडे, चंद्रशेखर सुगंधी, गोपाळ चतरकर सदस्य.

मंजित देशमुख वीज ग्राहक संघ प्रमुख यांनी वीजेच्या समस्यांबाबत तसेच निवारण केलेल्या तक्रारींबाबत माहीती दिली. जिल्ह्यातील पेट्रोल पंपाचे सर्वेक्षण गॅस – पेट्रोल ग्राहक संघा तर्फे करण्यात आल्याची व कुकिंग गॅस सिलेंडर ग्राहकांना वेळेवर मिळावे यासाठी ग्राहक पंचायत तर्फे करण्यात आलेल्या प्रयत्नांबाबत प्रमोद बोरकर यांनी सांगितले. संपर्क खुंटला कि कामाची गती कमी होते, त्यामुळे सर्वांनी एकमेकांच्या संपर्कात रहावे असे आवाहन मनोजकुमार अग्रवाल यांनी केले. ग्राहकांच्या समस्या सोडविणे हा ग्राहक पंचायतचा एकमेव उद्देश नसून त्यांना संघटीत करून, त्यांचे हक्क व कर्तव्यांबाबत जागृत करून स्वावलंबी बनवायचे प्रयत्न ग्राहक पंचायत १९७४ पासून करित असल्याचे हेमंत जकाते म्हणाले. वार्षिक ऑनलाईन सदस्यता नोंदणी बाबत त्यांनी माहिती दिली. त्यांनी नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तालुक्यात ग्राहक पंचायतचे काम वाढेल अशी खात्री व्यक्त करून ग्राम ग्राहक संघांची स्थापना करावी असे मत दिनेश पांडे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करूणा गवई यांनी तर आभार प्रदर्शन श्रीकांत बोरकर यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!