Home » Lok Sabha Election : राहुल बोंद्रेंसह 25 जणांविरुद्ध गुन्हा कारण..

Lok Sabha Election : राहुल बोंद्रेंसह 25 जणांविरुद्ध गुन्हा कारण..

Political Crime : आचारसंहिता लागू असताना आंदोलन केल्याने कारवाई

by नवस्वराज
0 comment

Buldhana News : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह काँग्रेसच्या 25 जणांविरोधात बुलढाणा शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू असताना आंदोलन केल्याचे हे प्रकरण आहे. काँग्रेस पक्षाचे बँक खाते गोठविण्यात आले आहे. या खात्यातील रक्कम वळती करण्यात आली आहे. काँग्रेसला 800 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा दंड ठोठावण्यात आला आहे. याचा निषेध करण्यासाठी बुलढाणा शहरात जयस्तंभ चौकात बोंद्रे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते.

Buldhana Crime : चिमुकल्यांचा वाद विकोपाला; 17 ग्रामस्थ जखमी

प्रतिबंधात्मक आदेश आणि आचारसंहिता लागू असताना आचारसंहिता काळात जमाव गोळा करीत आंदोलन केल्याप्रकरणी बोंद्रे यांच्यासह 25 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या या कारवाईने राजकीय वतुर्ळात खळबळ उडाली आहे. काँग्रेसला आयकर विभागाकडून 29 मार्चला नोटीस बजाविण्यात आली. आयकर विभागाने काँग्रेसला दंड ठोठावला आहे. आयकर विभागाच्या नोटीसमुळे 2024 मधील लोकसभा निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे.

कारवाईचा निषेध देशभरातून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर बुलढाण्यात जयस्तंभ चौकात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात जोरदार घोषणाबाजी व निदर्शने करण्यात आली होती. ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना कसे नामोहरम केले, याचे किस्से सामान्य जनतेमध्ये चर्चिले जात आहेत. येवढे करूनही भाजपचे समाधान न झाल्याने यंत्रणेचा वापर करून काँग्रेस पक्षाला दंड ठोठावण्यात आला. अशा कितीही कारवाया झाल्या तरी फरक पडणार नाही. आता जनताच या सरकारला धडा शिकवणार आहे, असे काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी नमूद केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!