Home » Lok Sabha Election : अभय पाटील; कोट्यवधींचे मालक, डोक्यावर कर्ज..

Lok Sabha Election : अभय पाटील; कोट्यवधींचे मालक, डोक्यावर कर्ज..

Akola Constituency : शक्ती प्रदर्शन करीत उमदेवारी अर्ज केला दाखल

0 comment

Congress News : डॉ. अभय पाटील यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे आलिशान वाहने, शेतजमीन व इतर मालमत्ता आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक असून त्यांच्यावर सहा कोटी ३७ लाखाचे कर्ज देखील आहे. डॉ. अभय पाटील यांनी बुधवारी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्जांसोबत त्यांनी संपत्तीचे विवरण देखील जोडले आहे.

अभय पाटील यांच्याकडे 9 कोटी 44 लाख 86 हजार 332 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. पत्नीकडे 5 कोटी 95 लाख 43 हजार 661 रुपयांची मालमत्ता आहे. हिंदू अविभक्त कुटुंबाकडे 4 कोटी 98 लाख 83 हजार 721 रुपयांची मालमत्ता आहे. अभय पाटील यांचा मुलगा अचिंत्यकडे 1 कोटी 16 लाख 46 हजार 178, मुलगी गार्गीकडे 68 लाख 87 हजार 669 रुपये आणि पाटील यांच्या आईकडे 55 लाख 73 हजार 782 रुपये अशी एकूण 22 कोटी 79 लाख 21 हजार 343 रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

पॉश वाहनांचे मालक

डॉ. पाटील यांच्याकडे चार आलिशान वाहने आहेत. त्यामध्ये 57 लाख व 29 लाखाची दोन वाहने त्यांच्या नावावर आहेत. 37 लाख व पाच लाखाची दोन वाहने पत्नी डॉ. रेखा पाटील यांच्या नावावर आहेत. पाटील कुटुंबाकडे एकूण 754 ग्राम सोने आहे. एकूण स्थावर मालमत्ता 38 कोटी 58 लाख 04 हजार 111 रुपयांची आहे. वारसहक्काने 16 कोटी 51 लाख 41 हजार 312 रुपयांची स्थावर मालमत्ता पाटील यांना प्राप्त झाली आहे. पत्नीकडे 7 कोटी 17 लाख 55 हजार 308, हिंदू अविभक्त कुटुंबाकडे 23 लाख 10 हजार, मुलाकडे 01 कोटी 08 लाख 52 हजार 800 आणि आईच्या नावावर 4 लाख 65 हजारांची स्थावर मालमत्ता आहे. डॉ. अभय पाटील यांच्यावर 6 कोटी 37 लाख 68 हजार 424, पत्नीच्या नावावर 01 कोटी 68 लाख 87 हजार 178, हिंदू अविभक्त कुटुंबावर 53 लाख 43 हजार 424, मुलावर 46 लाख 43 हजार 309 व मुलीच्या नावावर 03 लाख 08 हजार 261 रुपयांचे कर्ज आहे. प्रक्षोभक भाषण दिल्याबद्दल डॉ. पाटील यांच्या विरोधात शहर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्याचा फौजदारी खटला प्रलंबित आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!