Home » Akola AMC : अकोल्यातील डाबकी रोडवरील अतिक्रमणावर हटविले

Akola AMC : अकोल्यातील डाबकी रोडवरील अतिक्रमणावर हटविले

Encrochment Removal : पश्चिम झोनमधील बांधकाम केले जमिनदोस्त

by नवस्वराज
0 comment

भूषण इंदौरिया | Bhushan Indoriya 

Akola : महापालिकेच्यावतीने शुक्रवारी (ता. 16) शहराच्या पश्चिम झोनमध्ये असलेल्या डाबकी रोडवरील अतिक्रमण हटविण्यात आले. मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्‍या आदेशांवरून अकोला मनपा क्षेत्रातील पश्चिम झोनअंतर्गत डाबकी रोड रुंदीकरणाच्‍या कामामध्‍ये अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणावर निष्‍कासनाची कारवाई करण्‍यात आली.

डाबकी रोड हा अकोला शहर मंजूर विकास मोजणीनुसार 18 मीटर रूंदीचा आहे. सध्या हा रस्ता फक्‍त 12 मीटरचा अस्तित्‍वात राहिला आहे. या रस्‍त्‍यावर कच्‍चे व पक्‍क्‍या स्‍वरूपाचे बांधकाम करण्‍यात आले आहे. बांधकामाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या अतिक्रमणावर निष्‍कासनाची कारवाई करण्‍यात आली. डाबकी रोडवरील विद्युत पोल भूमिगत करून दोन्‍ही बाजूने रस्‍ता रूंदीकरण आता करण्‍यात येणार आहे. शुक्रवारी करण्यात आलेल्या कारावईत अतिक्रमण विभागाचे सहाय्यक अतिक्रमण अधिकारी प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, नगर रचना विभागाचे अभियंता राजेंद्र टापरे, रीतेश टेकाडे आदींनी सहभाग घेतला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!