Home » Advocate’s Murder : अकोल्यात वकिलांचे कामबंद आंदोलन; प्रलंबित संरक्षण कायद्याच्या मागणी

Advocate’s Murder : अकोल्यात वकिलांचे कामबंद आंदोलन; प्रलंबित संरक्षण कायद्याच्या मागणी

Rajaram Adhav : नगरमधील घटनेनंतर व्यक्त केला संताप

by नवस्वराज
0 comment

Akola : नगर जिल्ह्यातील राहुरी येथील न्यायालयात वकिली करणारे राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी मनीषा आढाव यांच्या हत्येनंतर आता वकील संघटना आक्रमक झाल्या आहेत. शिक्षेसोबतच वकिलांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात कायदा करण्याची मागणी करण्यात आली. अकोला वकील संघानेही सोमवारी (ता. 29) ठराव घेत न्यायालयीन कामकाज बंद ठेवले.

आढाव यांच्या हत्येमागे खंडणीचे कारण असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे वकीलही सुरक्षित नसल्याचा संताप अकोल्यातील बैठकीत व्यक्त करण्यात आला. वकिलांनी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची भेट घेत त्यांना वकील संरक्षण कायद्याबाबत पाठपुरावा करण्याची मागणी केली.

याप्रसंगी वकील संघाचे बी. के. गांधी, मोतीसिंह मोहता, दिलदार खान, बार अध्यक्ष राजेश जाधव, उपाध्यक्ष प्रवीण तायडे, देवाशिष काकड, शिवम शर्मा, मुमताज देशमुख, संतोष गोळे, लखन बदडिया, नंदू शेळके, नरेंद्र बेलसरे, ममता तिवारी, मंगला पांडे यांच्यासह शेकडो उपस्थित होते. वकील संरक्षण कायद्यासाठी केंद्रीय कायदा विभागाकडेही पाठपुरावा करण्यात येणार आहे. कायद्याचा प्रस्तावही तयार केला गेला आहे. मात्र हा कायदा मंजूर होऊन अस्तित्वात यायला वेळ लागत आहे. त्यामुळे वकील संरक्षण कायदा तातडीने अस्तित्वात यावा, यासाठी आता व्यापक आंदोलन होणार आहे. देशातील वकील संघटनांचा यात सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!