Home » Police Firing : पोलिसांवर गोळीबार करणाऱ्याची माहिती देणाऱ्यास बक्षीस

Police Firing : पोलिसांवर गोळीबार करणाऱ्याची माहिती देणाऱ्यास बक्षीस

by नवस्वराज
0 comment

Akola : उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असलेल्या पोलिसांवर गोळीबार करणाऱ्यांची माहिती देणाऱ्याला 25 हजार रुपयांचे बक्षीस अकोला पोलिसांनी जाहीर केले आहे. उरळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत 31 डिसेंबर 2023 रोजी मांजरी फाटा ते कंचनपूर रोडवर रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांवर मोटर सायकलवरील व्यक्तींनी गोळीबार केला होता.

गोळीबार केल्याच्या या घटनेतील आरोपींचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांवर फायर करणाऱ्यांविषयी माहिती देणाऱ्यास 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. (Prize of 25 Thousand Declared in Ural Police Firing Case of Akola)

पोलिसांवर झालेल्या या गोळीबारप्रकरणी उरळ पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा छडा न लागल्याने पोलिस अधिक्षक बच्चन सिंह व अप्पर पोलिस अधहक्षक अभय डोंगरे, बाळापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी गोकुळ राज, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरिक्षक शंकर शेळके, उरळ येथील ठाणेदार सहाय्यक पोलिस निरीक्षक गोपाल ढोले, उपनिरीक्षक गोपाल जाधव यांनी घटनास्थळाला भेट दिली. अधीक्षक सिंह यांनी संबधित अधिकाऱ्यांना वेगाने तपासच्या सूचना दिल्या. तपासात मदत करणाऱ्या व आरोपींची माहिती देणाऱ्यास 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे पोलिसांनी जाहीर केले आहे. उरळ पोलिस स्टेशन, अकोला येथील स्थानिक गुन्हे शाखा येथे माहिती असणारा व्यक्त प्रत्यक्ष किंवा फोनवरून आरोपींबाबत माहिती देऊ शकतो, असे पोलिसांनी जाहीर केले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!