Home » Akola Development : विकासाच्या प्रतीक्षेत अकोला 

Akola Development : विकासाच्या प्रतीक्षेत अकोला 

by नवस्वराज
0 comment

Akola | अकोला : स्वातंत्र्यानंतर देशात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता होती. अकोला येथे दिवंगत वसंतराव साठे ते मधुसूधन वैराळेंपर्यंत काँग्रेसचे लोकसभा प्रतिनिधी होते. जिल्ह्यातील विधानसभा देखील त्याच पक्षाच्या ताब्यात होती. त्यानंतर काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला भगदाड पडले. 50 वर्ष काँग्रेस तर 27 वर्ष भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यातील काहींनी केंद्र तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रीपदही भूषविले आहे. मात्र अद्यापही अकोल्यात पाहिजे तसा विकास झालेला नाही.(Akola Still Wating For Total Development)

विकास कार्याबद्दल अकोला जिल्हा अत्यंत दुर्दैवी आहे. आजच्याघडीला ज्याची सर्वात जास्त गरज आहे, त्या माहिती आणि तंत्रज्ञान, औद्योगिक शिक्षणाचे एकही महाविद्यालय जिल्ह्यात नाही. मोठ्या कंपन्या व औद्योगिक प्रकल्प नाही. औद्योगिक वसाहतीला घरघर लागली आहे. मोर्णा नदी खोलीकरण करून पाणी साठवण्याचे नियोजन नसल्यामुळे नदी कोरडी पडली आहे. जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले व वास्तूंची दुरवस्था झाल्यामुळे पर्यटन उद्योगाला वाव नाही. मोठे मैदान व स्टेडीयम नसल्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन होणे शक्य नाही. विमानतळाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. (Akola Airport Problem is Unsolved) त्यामुळे अकोल्याचा विकास ठप्प झाला आहे.

उच्च शिक्षण आणि नोकरीसाठी जिल्ह्यातील तरूणांना नाईलाजाने नागपूर, पुणे, मुंबईला जावे लागते. काॅटनसिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अकोल्यात पूर्वी कापसाच्या अनेक जिनिंग व प्रेसिंग फॅक्टरी होत्या. नॅशनल टेक्सटाइल काॅर्पोरेशनच्या दोन मिल, बिरलाची एक ऑईल मील, निळकंठ सूत गिरणी तसेच हस्ती पाईपचा कारखाना अकोल्यात होता. परंतु सर्व एकापाठोपाठ बंद झाल्यामुळे हजारो लोक बेरोजगार झालेत. आर्थिक उलाढालीस खिळ बसली. अकोल्याचे लोकसभा आणि विधानसभा सदस्य 70 वर्षात एकही मोठा प्रकल्प आणू शकले नाही. (Akola MP & MLA Failed To Bring Big Industrial Project) जे होते ते देखील ते वाचवू शकले नाहीत, यापेक्षा मोठे दुर्दैव काय असू शकते. लोकसंख्येच्या अनुषंगाने अकोला शहराचा भौगोलिक विस्तार वाढला असला तरी विकासशून्य शहर आणि जिल्हा असल्यामुळे तरूणांचा ओघ पुणे, मुंबईकडे जात आहे.

इतिहासाचे अवलोकन केले तर अकोला जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाचे जनप्रतिनिधी आणि नेते एकमेकांवर कुरघोडी करून आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यात मग्न आहेत. विकासाची दूरदृष्टी, अभ्यास, इच्छाशक्ती आणि नियोजनाचा अभाव जाणवतो. गलिच्छ राजकारणामुळे चांगले अधिकारी येथे येण्यास उत्सुक नाही, आलेच तर टिकत नाहीत. त्यामुळे शहर दिवसेंदिवस भकास होते आहे. पक्षभेद विसरून सर्वांनी केवळ महानगराच नव्हे तर जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे नागरीकांचे मत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!