अकोला : अनेक शाळा शैक्षणिक साहित्य, वह्या, पुस्तके, गणवेश, दफ्तर आदी ठराविक दुकानातून खरेदी करण्याची सक्ती पालकांवर करतात. साहीत्याची मुळ किंमती पेक्षा अधिक किंमतीने विक्री करण्यात येते. आपल्या पाल्यांना त्रास होईल, या भितीपोटी पालक जास्त पैसे मोजून शाळा व्यवस्थापनांच्या ठरलेल्या दुकानातून साहीत्य विकत घेतात.
पालकांच्या आर्थिक शोषणाकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष आहे. याबाबत पालकांनी न घाबरता शिक्षण विभाग अथवा अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडे रितसर तक्रार करावी असे आवाहन अमित शिरसाट शिक्षक संघ प्रमुख यांनी केले असल्याचे विजय केंदरकर व मिलिंद गायकवाड प्रसिद्धी प्रमुख यांनी कळवले आहे.