Home » विदर्भातील ‘या’ दोन जुळ्या स्टेशनचे भाडे १७५ रुपये

विदर्भातील ‘या’ दोन जुळ्या स्टेशनचे भाडे १७५ रुपये

by नवस्वराज
0 comment

नागपूर : प्रवास भाडे परवडणारे असल्याने प्रवासी रेल्वेला प्राधान्य देतात. परंतु विदर्भातील दोन स्टेशन असेही आहेत, ज्यांचे आपसातील अंतर केवळ तीन किलोमीटर असले तरी प्रवास भाडे ६० ते १ हजार २५५ रुपये आहे. हा भारतील रेल्वेच्या दप्तरी सर्वांत छोटा रेल्वे रुट आहे. या दोन स्थानकांची नावे आहे नागपूर आणि अजनी.

भारतीय रेल्वेच्या दप्तरी दोन्ही स्थानकांची स्वतंत्र स्थानक म्हणून नोंद आहे. नागपूर ते अजनी हा प्रवास ५ ते ९ मिनिटांत पूर्ण होतो. परंतु या दोन स्थानकांदरम्यान प्रवास करण्यासाठी तिकिट काढायचे म्हटल्यास नियमानुसार किमान ६० रुपये तर कमला १ हजार २५५ रुपये मोजावे लागू शकतात. नागपूर आणि अजनी रेल्वे स्थानकावर लोक सध्या आहे त्याच तिकिटात किंवा प्रसंगी विनातिकिट प्रवास करतात. नागपूर रेल्वे स्थानकावरून तिकिटाचे बुकिंग असतानाही अजनी स्थानकावरून रेल्वेत चढतात. रेल्वे अधिकाऱ्यांनी मनात आणल्यास ते अशा प्रवाशांना दंड ठोठावू शकतात. परंतु लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून या बाबीकडे मध्य रेल्वे दुर्लक्ष करते.

नागपूरपासून अजनी रेल्वे स्थानकाचे अंतर तीन किलोमीटर आहे. नागपूर ते अजनी असा प्रवास करायचा झाल्यास अनारक्षित जनरल तिकिट ६० रुपयांचे आहे. स्लिपर क्लासचे भाडे १७५ रुपये पडते. एसी फर्स्ट क्लासने प्रवास करायचा झाल्यास नागपूर ते अजनी या तीन किलोमीटरच्या प्रवासासाठी १ हजार २५५ रुपये मोजावे लागतात. रेल्वेच्या नियमानुसार हे तिकिटदर आहेत. नागपूर ते अजनी या रेल्वे स्थानकादरम्यानचे अंतर तीन किलोमीटर असले तरी भाडे मात्र ३०० किलोमीटरच्या अंतराचे मोजावे लागते. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही प्रवास करण्यापूर्वी बुकिंग करीत असाल तर रेल्वेत चढण्यासाठी योग्य स्टेशनची निवड नक्की करा. म्हणजे नागपूर स्थानकावरून चढणार किंवा उतरणार असाल तर तिकिट बुक करताना नागपूर स्टेशनचीच निवड करा आणि अजनी स्थानकावरून चढणार किंवा उतरणार असाल तर अजनी स्टेशनचीच निवड कराल.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!