Home » Lok Sabha Election : प्रकाश आंबेडकरांनी तुषार गांधींना सुनावले खडे बोल

Lok Sabha Election : प्रकाश आंबेडकरांनी तुषार गांधींना सुनावले खडे बोल

Prakash Ambedkar : राजकीय ज्ञान नसल्यास निरर्थक आरोप करू नका

by admin
0 comment

Akola Politics : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे पणतू एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत वंचितमुळे मतविभागणी होऊ शकते, मतांचे विभाजन करण्याचे काम वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम करत आहेत. हे दोन्ही पक्ष भाजपची बी टीम आहेत. त्यांना मतदान न करण्याचे आवाहन तुषार गांधी यांनी केले. यावरुन राजकीय वातावरण तापले असून, गांधी यांच्या या टीकेचा प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या X handle वरून खरपूस समाचार घेतला आहे.

वंचितने, महाविकास आघाडीत सहभागी होऊन निवडणूक लढवावी, असा आग्रह महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या नेत्यांनी धरला होता. यासाठी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी वारंवार चर्चादेखील करण्यात आली होती. मात्र जागावाटपाचे कारण पुढे करत प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीतून बाहेर पडले. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचे जाहीर करत काही ठिकाणी त्यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणादेखील केली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या निर्णयावर तुषार गांधी यांनी कडक शब्दांत टीका केली आहे. त्याचे जोरदार प्रत्युत्तर प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी एक्स हॅंडलवरून खरी बाजू लक्षात आणून दिली आहे. आंबेडकर म्हणाले,तुम्ही अलिकडे केलेले विधान अत्यंत चुकीचे,कोणताही आधार नसलेले आणि वंचित बहुजनांच्या राजकारणात अडथळा निर्माण करणारे आहे. तसेच संसदीय लोकशाही आणि स्वतंत्र राजकीय नेतृत्वासाठीच्या प्रयत्नांना,तसेच वर्ग,जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन सुरू असलेल्या सर्वसमावेशक राजकारणाला खिळ घालणारे आहे.

तुषार गांधी यांची कानउघडणी करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीसोबत कसा व्यवहार केला, त्यांचे राजकारण किती अलिप्त आहे, तसेच महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये झालेली तडजोड तुम्हाला माहिती नाही का? असा प्रश्नही आंबेडकरांनी, तुषार गांधींना विचारला आहे.

आंबेडकर म्हणाले की, तुमच्याकडे ( तुषार गांधी ) राजकीय ज्ञान आणि समज नसेल, तर निरर्थक गोष्टी आणि निराधार आरोप करण्यात वेळ घालवू नये. काळच सत्य परिस्थिती समोर आणेल. सगळे संकेत स्पष्ट दिसत असताना, तुम्ही संदर्भहीन व आधार नसलेले वक्तव्य करून जनतेमध्ये गैरसमज निर्माण करीत आहात असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!