Home » Land Mafiya : अकोल्यात भूखंड घोटाळा; विजय मालोकार यांच्याकडून..

Land Mafiya : अकोल्यात भूखंड घोटाळा; विजय मालोकार यांच्याकडून..

Homeopathic College : मध्यभागी असलेल्या जमिनीची विक्री वादात

by नवस्वराज
0 comment

Crime News : अकोल्यातील गोरक्षण रोडवर असलेल्या होमिओपॅथी शिक्षण सं‌स्थेची दहा एकर जागेच्या विक्रीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप विजय मालोकार यांनी करीत खळबळ उडवून दिली आहे. यासंदर्भात मालेाकार यांनी राज्य सरकार, अकोल्याचे जिल्हाधिकारी आणि विभागीय सहाय्यक धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. सध्या 200 कोटी बाजारभाव असलेली ही जागा फक्त 50 ते 60 कोटींत विकण्याचा घाट असल्याचा मालोकार यांचा आरोप आहे. संस्थेचे हे होमिओपॅथी कॉलेज अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर एका भाड्याच्या इमारतीत चालवले जात असल्याचेही मालोकार यांनी तक्रारीत म्हटले आहे.

मालोकार यांच्या तक्रारनुसार, अकोला शहरातील गोरक्षण मलकापूर मार्गावर 1959 मध्ये एक जागा नाममात्र मोबदल्यात विकत घेतली. 4 लाख 34 हजार 865 चौरस फुट म्हणजेच 4 हेक्टर 4 आर एवढी आहे. या जागेवर होमिओपॅथी महाविद्यालयाचं बांधकाम न झाल्याने ती तशीच मोकळी होती. आता ही जागा संस्थेच्या संचालक मंडळातील काहींना हाताशी धरून बळकावण्याचा घाट काही लोकांकडून घातला जातो आहे. ही जागा आता विकण्यासाठी ट्रस्टने जाहीर निविदा काढली आहे. ही जागा महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 अंतर्गत नोंदणीकृत आहे. अधिनियमातील तरतुदीनुसार जमिनीचा व्यवहार करण्यापूर्वी किंवा त्याची लिलाव विक्री प्रकाशन करण्यापूर्वी धर्मदाय आयुक्तांची परवानगी घेणे गरजेचे आहे. असे असतानाही जमिनीची विक्री होत असल्याचे मालोकार यांचे म्हणणे आहे.

गोरक्षण मार्गावरील ही जागा घशात घालण्याचा अनेकांचा डाव आहे. यात काही भूमाफिया, राजकारणी आणि बिल्डरचा समावेश आहे. अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यातील काही लोक या व्यवहारात गुंतल्याचा आरोप होत आहे. निविदा काढतांना सर्वच नियम धाब्यावर बसवले गेलेत. निविदा प्रक्रियेत जागेचा ‘लेआऊट नकाशा’ मंजूर झालेला असतांना विक्री मात्र एकरानुसार करणार असल्याचे नमूद करण्यात आल्याचा आरोपही विजय मालोकार यांनी तक्रारीत केला आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!