Home » Akola Police : चोरीच्या तीन बाइक्स जप्त; एकाला पकडले

Akola Police : चोरीच्या तीन बाइक्स जप्त; एकाला पकडले

Crime News : स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई

by नवस्वराज
0 comment

Bike Theft : अकोला जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या घटनांचा पोलिसांनी छडा लावला आहे. दिवसेदिवस या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याची सूचना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना केली आहे. गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर शेळके यांनी यासाठी खास पथक तयार करून तपासाला सुरुवात केली.

पोलिस उपनिरीक्षक राजेश जवरे यांनी गुरुवारी (ता. 28) मिळालेल्या माहीतीवरून शरद अशोक सहारे (वय 30, रा. खानापूर वेस, अकोट) याला अटक केली. साथीदाराच्या मदतीने राजेश हा बाइक चोरी करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या जवळून पोलिसांनी हिरो कंपनीची सीबी शाईन, पॅशन प्रो कंपनीची एक मोटारसायकल आणि ड्रिम युगा कंपनीची बाइक अशा तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. एकूण 1 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील कर्मचारी उमेश पराये, फिरोज खान, सुलतान पठाण, रवी खंडारे, महेन्द्र मलीये, गोकुळ चव्हाण, वसीमोद्दीन, आकाश मानकर, अभिषेक पाठक, प्रशांत कमलकार, उपनिरीक्षक अख्तर शेख, मनीश कुलट, विशाल हिवरे, रवी सदांशिव यांनी ही कारवाई केली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!