Nagpur : अवकाळी पाऊस व गारपिटीने पुन्हा एकदा विदर्भातील अनेक जिल्ह्यांना तडाखा दिला आहे. नागपूरसह पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाने झोडपल्यानंतर आता यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. वादळी पावसामुळे यवतमाळमध्ये अनेक घरांची व झाडांची पडझड झाली आहे. आर्णी, यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, पुसद, महागाव, उमरेड आदी भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आर्णी तालुक्यातील एका वृद्धाश्रमाचे छप्पर उडाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात अनेक शाळांवरील टीनपत्र्याचे छप्पर उडून गेले आहे. नागपूरमध्येही वादळी पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीतून अद्यापही विदर्भातील अनेक जिल्हे सावरलेले नाहीत.
Unseasonal Rain : विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा
previous post