Akola News : मतदारांचा विश्वास सार्थ करणे, जबाबदारीने काम करणे, कामाला गती देणे हे एकमेव लक्ष असल्याचे प्रतिपादन अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी केले. सामाजिक आणि राजकीय काम करताना जनतेला दिलेला शब्द, कर्तव्य पूर्ण करायचे आहे. द्वेषबुद्धीने काम न करता, कोणताही भेदभाव न करता विकास करायचा आहे. दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्याची गरज कधीही भासणार नाही. मलकापूर भागातील नागरिक आमच्या परिवारातील आहेत. त्यामुळे या भागाचा सर्वांगीण विकास साधायचा आहे. रस्ते, पाणी, पथदिवे ही समस्या दूर केली आहे. भाजपा ही विकासकाम करणाऱ्यांची पार्टी असून मलकापूरचा चेहरामोहरा बदलला जाईल, असे सावरकर म्हणाले.
नाबार्डककडून खासदार संजय धोत्रे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देऊन 29 कोटी रुपये शहरी आणि ग्रामीण भागातील विकासासाठी वापरण्यात आले आहेत. अकोल्यातील नागरिक हे सुजाण आहेत. त्यामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहनही सावरकर यांनी केले.
मलकापूर चौक विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अकोला लोकसभा भाजपा प्रभारी अनुप संजय धोत्रे होते. प्रमुखा अतिथी म्हणून विजय अग्रवाल, श्रावण इंगळे, कृष्णा शर्मा, गणेश अंधारे, निलेश निनोरे, चंद्रशेखर पांडे, विशाल इंगळे, चंदा शर्मा, सुमन गावंडे, माधव मानकर, विजय मालोकार, अंबादास उमाळे, देवेंद्र देवर, प्रवीण हगवणे, अशोक राठोड आदी उपस्थित होते. मतदारांना दिलेले शब्द पूर्ण करणे हे कर्तव्य आहे. मतांचे राजकारणापेक्षा मानवता तसेच सर्वंकष विकासावर भर दिला जाणार असल्याचे सावरकर म्हणाले.
अकोला जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृतीचे जतन करणे तसेच प्रत्येक व्यक्तीच्या समस्या सोडविण्यावर भर देणे हे आपण आपले कर्तव्य मानतो. मलकापूर चौक ते संत तुकाराम हॉस्पीटलपर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण, काँक्रिटीकरण होत आहे. मलकापूर चौक ते कातखेड मार्गाचे डांबरीकरण आणि चौपदरीकरण होणार आहे. त्यामुळे दळणवळणासोबत अनेक सुविधा मिळणार असल्याचे अनुप संजय धोत्रे म्हणाले. यावेळी श्रावण इंगळे यांनी जातीपातीपेक्षा विकास करण्यावर भर देण्यात येत असल्याचे नमूद केले. आगामी लोकसभा निवडणुकीत ‘चारसौ पार’ अभियानात अकोलेकर मागे राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कृष्णा शर्मा, विजय अग्रवाल यांनीही विचार व्यक्त केले.
दक्षिण मंडळ अध्यक्ष गणेश अंधारे, श्रावण इंगळे, ज्ञानेश्वर पोटे, विद्याधर काकड, मनीष बुंदिले, विनोद मापारी, विजय इंगळे, गणेश पावसाळे, हरीश अलीमचंदानी, बाळ टाले, विशाल इंगळे, प्रवीण जगताप, गोपाल मुळे, दिलीप भरणे, राजेश वगारे, नितीन गवळी, सुरेश भागानगरे, अनिल अधनकर, राजू धोटे, सुधीर बंड, राजेश मिरगे, प्रल्हाद पाटील, सुभाष पाटील, मनोहर सुर्वे, प्रदीप दळवी, दामोदर माळी, रघुनाथ मुळे, मनोहर गवळी, आनंद गवळी, देवजीआप्पा भागानगरे, भगवान भागानगरे, देव माळी, पंकज जानुनकर, प्रवीण मुरूमकर, संजय झाडोकार, अशोक कांबळे, ज्ञानेश्वर ठाकरे, मंगेश लवारे, संग्राम इंगळे, मधुकर काकड, श्रीकृष्ण इंगळे, रवींद्र ठेंग, राजेंद्र ठाकरे, नंदू यमगवळी, सचिन गवळी, अमोल नसुडे, दिनेश महानकर, दामोदर महानकार, भूषण देशमुख, मयूर देशमुख, निलेश कुळकर्णी, माणिक खंदरकर, पंकज मांगुळकर, कैलास उबाळे, रवी मालोकार, दिनेश भागानगरे, श्रीकांत गोरले, अमन उस्केल आदी उपस्थित होते.
महिलांचा उदंड सहभाग
मलकापुरातील कार्यक्रमात महिलांच्या उपस्थितीही मोठी होती. शारदा ढोरे, शोभा यादव, द्वारका भरणे, रत्ना महानकार, रूपाली धोटे, अस्मिता वगारे, प्रतिभा मुळे, रूपाली थोरात, श्रुती थोरात, जिजाबाई थोरात, वैशाली मांगुळकर, नर्मदा मुळे, चित्रा मानकर, संगीता जगदाळे, श्रुती देव, अनिता बागडे, माधुरी गुजर, शारदा यादव , शिल्पा देशमुख, शिल्पा देशपांडे, प्रगती कुलकर्णी, सोनाली पिंजरकर, अनिता भटकर, वनमाला ठाकरे, सुवर्णा भरणे, आशा काळे, सुदीपा वाडकर, भूमिका तायलकर आदींची उपस्थिती होती.