Home » Woman Suicide : पोटच्या लेकीला विहिरीत ढकलत आईची आत्महत्या 

Woman Suicide : पोटच्या लेकीला विहिरीत ढकलत आईची आत्महत्या 

by नवस्वराज
0 comment

Chandrapur  : आईने 13 वर्षीय मुलीला विहिरीत ढकलत स्वतः आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सावली तालुक्यातील खेडी येथे घडली. ही घटना नागरिकांच्या मनाला चटका लावून गेली आहे. दर्शना दीपक पेटकर (वय 35), समीक्षा दीपक पेटकर (वय 13) असे मृत आई व मुलीचे नाव आहे. दीपक पेटकर यांच्या शेतखेडी शिवारात आई दर्शना, मुलगी समीक्षा व मुलगा सोहन हे  गेले होते. पेटकर यांच्या शेताला लागून असलेल्या दुसऱ्या शेतातील विहिरीत दर्शनाने 13 वर्षीय मुलगी समीक्षा‌ हिला ढकलले. त्यानंतर दर्शनाने मुलगा सोहनला सुद्धा ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र सोहननी हात झटकून पळ काढला. त्यामुळे तो वाचला. त्यानंतर दर्शनाने आत्महत्या केली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!