Home » Amravati Crime : अवघ्या 100 रुपयाच्या बाटलीसाठी आईलाच संपविले

Amravati Crime : अवघ्या 100 रुपयाच्या बाटलीसाठी आईलाच संपविले

Police Action : दारूच्या पैश्यासाठी आईशी करायचा भांडण

0 comment

Amravati : जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील भोकरबर्डी येथे मद्यपी मुलाने दारू पिण्यासाठी 100 रुपये न दिल्यामुळे आईचा खून केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. या घटनेमुळे भोकरबर्डी परिसरात खळखबळ उडाली आहे.

मेळघाटातील भोकरबर्डी येथील रहिवासी असलेल्या गंगाबाई मोतीलाल जांबेकर या शेती करायच्या. त्यांचा मुलगा पवन मोतीलाल जांबेकर हा बेरोजगार असून त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. दारू पिण्यासाठी पवन सतत आई गंगाबाईकडे पैशांची मागणी करायचा. घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे गंगाबाई पवनला पैसे देत नव्हत्या. वेळोवेळी समजावून सांगूनही तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. पैसे असूनही आई पैसे देत नाही म्हणून पवन आईशी नेहमी वाद घालायचा.

आईच्या बँकेच्या खात्यात पी. एम. किसान सन्मान योजनेचे पैसे जमा झाल्याचे मुलगा पवन जांबेकरला कळाले. 2 मार्च शनिवारी पवनने आईकडे दारू पिण्यासाठी 100 रुपयांची मागणी केली. आईने नकार देताच, बँकेत पैसे असूनही आई पैसे देत नसल्याच्या रागातून पवनने आईशी भांडण सुरू केले. गंगाबाईने पवनला विरोध करताच त्याचा राग अनावर झाला. रागावलेल्या पवनने दारूच्या नशेत आई गंगाबाईला काठीने बेदम मारहाण केली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या गंगाबाईचा जागेवर मृत्यु झाला. हत्येच्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून चौकशी केली. त्यात पवनने आपल्या आईला मारल्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी पवनला ताब्यात घेत हत्येचा गुन्हा नोंदविला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!