Akola : विद्याभारतीच्यावतीने 25 फेब्रुवारी रोजी गायगाव येथे पारिवारीक स्नेहमिलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अकोला महानगर संघचालक गोपाल खंडेलवाल, विद्याभारती विदर्भ प्रांत अध्यक्ष राम देशमुख, प्रांत मंत्री मंगेश पाठक, सहमंत्री समीर थोडगे, जिल्हा अध्यक्ष विठ्ठल खारोडे उपस्थित होते.
अकोला शहरात विद्याभारतीशी संलग्न असलेल्या पाच शाळा आहेत. या शाळांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व पाच आधारभूत विषयांच्या आधारावर विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले जाते. मनुताई कन्या शाळा परिसरात सरस्वती शिशू वाटिका गेल्या वर्षी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना विना पाटी पुस्तक, पंचकोशांच्या विकासासाठी क्रियाकलाप आधारीत मातृभाषेतून शिक्षण दिल्या जाते. अशा प्रकारच्या शिक्षणामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्याभारतीचे नवनियुक्त अकोला महानगर अध्यक्ष मंगेश वानखडे हे जनसखा शिक्षण युवक कल्याण, समाज कल्याण, व्यायाम क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्षही आहेत. त्याच्याअंतर्गत जुने शहर, भिरड वाडीतील श्री संताजी इंग्रजी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय तसेच त्यांच्या द्वारे स्व. विनयकुमार पाराशर मराठी प्राथमिक व माध्यमिक शाळा, गुरुदत्त नगर डाबकी रोड अकोला या शाळांचे संचालन केले जाते.
मंगेश वानखडे यांनी अकोला महानगरात विद्याभारतीचे काम वाढविण्यासाठी अधिक जोमाने कार्य करणार असल्याचे सांगितले. यावेळी विद्याभारतीच्या जिल्हा उपाध्यक्ष माधवी कुळकर्णी, जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. विक्रम जोशी, जिल्हा प्रमुख शरद वाघ, महानगर प्रमुख योगेश मल्लेकर, तारा हातवळणे, रेखा खंडेलवाल, श्रीदेवी साबळे, डॉ. सुबोध लहाने, मृणाल कुळकर्णी, शुभांगी जोशी, लता कुऱ्हेकर, नेहा खंडेलवाल, पल्लवी कुळकर्णी यांच्यासह विद्याभारतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.