Nagpur विचार करा जर दोन ते चार दिवस तुमच्या घरची वीज गेली तर … किंवा तुम्ही तुमचा फोन चार्ज केला नाही तर… मानवी जीवनात सर्वच उपकरण आज महत्वाचे होऊन बसले आहे, त्यात आयटी कंपनी आणि सर्वच गोष्टी विजेच्या माध्यमावर अडकून पडलेल्या आहे, त्यातच विज कर्मचारी यांनी संप पुकारला तर…
होय 5 मार्च पासून हे होणारच, कंत्राटी कामगारांच्या संयुक्त कृती समितीने कामगारांच्या मागण्यांसाठी २० फेब्रुवारीला धरणे, २८ फेब्रुवारीपासून दोन दिवस कामबंद तर ५ मार्चपासून बेमुदत कामबंदची नोटीस तिन्ही वीज कंपन्यांसह सरकारला दिली आहे. यामुळे राज्यातील वीज यंत्रणा विस्कळीत होण्याचा धोका आहे.महावितरण, महानिर्मिती, महापारेषण या सरकारी वीज कंपन्यांमध्ये सुमारे ४२ हजार कंत्राटी कामगार वर्षानुवर्षे कंत्राटी म्हणूनच सेवा देत आहेत. त्यांना स्थायी करण्याच्या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलन झाले. परंतु, आश्वासनापलीकडे काही मिळाले नाही. त्यामुळे कंत्राटी कामगार संतप्त झाले आहेत. दरम्यान, राज्यातील २५ हून जास्त कामगार संघटनांनी ३ फेब्रुवारीला ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर या गृह शहरात एकत्र येत आंदोलनाचा निर्णय घेतला. त्यानुसार, २१ फेब्रुवारीला राज्यभरात सकाळी १० ते ५.३० वाजता दरम्यान धरणे, दुसऱ्या टप्यात २८ आणि २९ फेब्रुवारीला राज्यभरात ४८ तास कामबंद केले जाईल. त्यानंतरही सरकारने मागण्या मान्य न केल्यास ५ मार्चपासून बेमुदत कामबंद करणार असल्याचे संयुक्त कृती समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पाहण्या जोगे होईल की कामगाराच्या मागण्या पूर्ण होतात की नाही.