Jalna : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणारे मनोज जरांगे पाटील यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यासाठी डॉक्टरांचे पथक अंतरवली सराटी येथे पोहोचले आहे. शुक्रवारी रात्री अचानकपणे मनोज जरांगे पाटील याना त्रास सुरू झाला होता. त्यानंतर लगेचच रात्री त्यांच्या छातीचा इसीजी काढण्यात आला. त्यात कुठलाही धोका नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता अंतरवलीतच जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत. पित्त वाढल्यामुळे छातीत कळ आली असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगर येथून उपचार पूर्ण करून अंतरवली सराटी आंदोलनस्थळी दाखल झाले होते. रात्री अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना वेदना होऊ लागल्याने तत्काळ त्या ठिकाणी डॉक्टरांचे पथक दाखल झाले आहे.
डॉक्टरांच्या पथकांनी त्यांच्यावर उपचार करत त्यांना इंजेक्शन आणि सलाइनही दिले. मात्र, अचानक छातीत दुखणे हे गंभीर असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी म्हटले आहे. जरांगे पाटलांना डॉक्टरांनी इंजेक्शन आणि सलाइन लावले आहे. मात्र उपचाराला त्यांची साथ नाही. डॉक्टरांनी सलाइन लावून उपचार केल्यानंतर जरांगे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. सध्या त्यांची तब्येत बरी असून डॉक्टरांनी त्यांचा ईसीजी काढला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरातील रुग्णालयात उपचार सुरू होते. चार दिवसांच्या उपचारानंतर ते शुक्रवारी अंतरवली सराटीमध्ये आले, मात्र त्यानंतर मध्यरात्री त्यांची प्रकृती अचानक खालावली. अंतरवालीमध्येच त्यांच्यावर डॉक्टरांनी उपचार केले.
उपचार कायम
मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे 17 दिवस उपोषण केले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयरे कायद्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगेंच्या या भूमिकेमुळे राज्यभरात मराठा बांधवही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. उपोषणामुळे मनोज जरांगेची प्रकृती नाजूक झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू होते. चार दिवसांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला होता. त्यानंतर काही तासांतच पुन्हा त्यांची प्रकृती खालावली.