अकोला : अजिंक्य फिटनेस पार्क द्वारा २७ ऑगस्ट रोजी सकाळी रतनलाल प्लॉट चौकात अजिंक्य फिटनेस पार्क आणि मारवाडी युवा मंच यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित सायकॉलॉथॉन चे स्वागत सूर्यनमस्कार रिले करण्यात आले. सायकल चालवणे किंवा हृदय सुरक्षित राहण्यासाठीचे व्यायामाप्रमाणेच सूर्यनमस्काराचा व्यायाम आहे, त्यामुळे सर्वात जास्त उष्मांक जळतात, हा व्यायाम कोणीही – कुठेही आणि कधीही करू शकतो.
दुर्गा चौक ,रतनलाल प्लॉट चौक, सिविल लाईन चौक, येथे रहदारी नियंत्रणासाठी तसेच रॅली करता अजिंक्य फिटनेस पार्कच्या स्वयंसेवक दशरथ घोगरे, रोशनी पांचाले, लतिका खडसे, राधा सराफ, अस्मिता मिश्रा, माधुरी भगत, सुचिता धनभर, पल बोरकर, अभीसाई अमेर, दर्श जालान, यश पारधी, वरूण मांडाणी, आदित्य चोपडे, गार्गी भगत, गार्गी धनभर, भाग्यश्री अभ्यंकर, रेखा चांडक, अरुण परभणीकर, सानिका खापरकर, डॉ निर्मला रांदड,डॉ प्रविणा चौखंडे, राधा येडलेवार, अभिलाषा खारकर, सौ सुवर्णा बोरकर, कुशाल शlह, धनंजय भगत, प्रशांत वाहुरवाघ, धीरज काळसाईत, राजेश जालान,षआशिष नेताम, शारदा डोंगरे, स्वरा खडसे या स्वयंसेवकांनी घेतला
पुढील सूर्यनमस्कार रिले/साखळी/ मॅरेथॉन चे आयोजन रथसप्तमीचे दिशी १६ फेब्रुवारी २०२४ करण्यात आले आहे. यामध्ये सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा आवश्यक प्रशिक्षण, सरावासाठी अजिंक्य फिटनेस पार्क येथे नोंदणी करावी असे आवाहन संचालक धनंजय भगत यांनी केले आहे.