अकोला : अकोल्यातील चार जलकुंभांचा पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने आता नळ कोरडे आणि अकोलेकरांच्या डोळ्यात पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्काडा अॅटोमेशनचे काम सुरु असल्याने दोन जलकुंभावरून होणारा पुरवठा विस्कळीत आहे. आता जुन्या शहरात ४५० मिलीमिटर व्यासाचा व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने शिवनगर आणि आश्रयनगर या दोन जलकुंभाचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे.
चार जलकुंभांवरून पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने १ लाख २७ हजार लोकांना फटका बसला आहे. अकोट फैल भागातील जलकुंभावरून ६७ हजार नागरिकांना पाणी पुरवठा होतो. शिवनगर भागातील जलकुंभावरुन ४० हजार तर आश्रय नगर भागातील जलकुंभावरुन २० हजार नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. सध्या शिवनगर, शिवाजी नगर, काळा मारोती परिसर, विठ्ठल मंदिर परिसर, शिवचरण पेठ, रेणुका नगर, चिंतामणी नगर, सोपीनाथ नगर, भारती प्लॉट, गोडबोले प्लॉट, वानखडे नगरचा काही भाग, गणेश नगर, गोंडपूरा, वाल्मिकी नगर, रमेशपूरा तसेच आश्रय नगर जलकुंभावरील मेहरे नगर, आश्रय नगर, श्री स्वामी समर्थ केंद्र परिसर, लक्ष्मी नगर, कोर्ट कॉलनी, सरस्वती नगर आदी भागातील पाणी पुरवठा खंडीत झाला आहे.