Akola : अयोध्या येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठा व मंदिर भक्तार्पण सोहळा आटोपून अंजनगाव सुर्जीच्या श्रीदेवनाथ पिठाचे मठाधीपती श्री जितेंद्रनाथ महाराज यांचे राजराजेश्वर नगरी म्हणून ओळख असलेल्या अकोला रेल्वे स्थानकावर आगमन झाले. रामभक्तांनी हारार्पण करून, जय श्रीराम, भारत माता की जय अशा घोषणा देत त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
यावेळी नंदू देशपांडे, डॉ. अशोक ओळंबे, माजी आमदार वसंतराव खोटरे, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, रेखा खंडेलवाल, झुनझुनवाला, मयूर खंडेलवाल, माजी नगराध्यक्ष हरीश अलीमचंदानी, रतनलाल खंडेलवाल, किरण मोरगावकर, शिरीष धोत्रे, अर्चना धोत्रे, विजय मालोकार, संजय चौधरी, मुकेश गव्हाणकर, आशुतोष काटे, प्रभाकर वानखडे, योगेश गोतमारे, विनोद जकाते, सिद्देश मुरारक आदी रामभक्त महिला, पुरुष व युवक उपस्थित होते.