Mumbai : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. देशात सात टप्प्यांमध्ये तर महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. 19 एप्रिलपासून देशात लोकसभा निवडणूक होणार असून 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी ही घोषणा केली. 16 जून रोजी मोदी सरकारचा कार्यकाळ संपत आहे. सरकारचा कार्यकाळ संपत आल्याने नियमानुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार राजकिय पक्षांची लगबग दिसत आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वाट्याला येणाऱ्या जवळपास 16 जागा निश्चित झाल्या आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची लोकसभा निवडणुकीसाठी यादी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाने एकूण 16 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. ठाकरे गटाने मुंबईतील चार मतदारसंघांसह छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, नाशिक, ठाणे, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि इतर मतदारसंघातील उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत.
कोणा कोणाला संधी?
विनोद घोसाळकर : उत्तर मुंबईसं, जयदिना पाटील : ईशान्य मुंबई, अरविंद सावंत : दक्षिण मुंबई, अनिल देसाई : दक्षिण मध्य मुंबई, चंद्रकांत खैरे : छत्रपती संभाजी नगर, नरेंद्र खेडकर : बुलढाणा, संजय देशमुख : यवतमाळ, ओमराजे निंबाळकर : उस्मानाबाद, बंडु जाधव : परभणी, वाघचौरे : शिर्डी, विजय करंजकर : नाशिक, राजन विचारे : ठाणे अनंत गिते : रायगड, नागेश अष्टीकर : हिंगोली, विनायक राऊत : रत्नागिरी- सिंधुदुर्ग, चंद्रहास पाटील : सांगली.
उमेदवार न ठरलेले मतदारसंघ
कल्याण डोंबिवली, मावळ, पालघर, जालना.