Akola | अकोला : केंद्र सरकारने नवीन मोटर वाहन कायदा पारित केला आहे. कायद्यानुसार ट्रकमुळे एखादी व्यक्ती जखमी झाल्यास त्याला तत्काळ रूग्णालयात नेले पाहिजे, तसे न केल्यास आणि ट्रकचालक दोषी आढळून आल्यास त्याला 10 वर्षांची शिक्षा तसेच दंडाची तरतूद करण्यात आली आहे. नवीन कायद्यामुळे ट्रक चालक नाराज असून या कायद्याला देशभरातील ट्रक चालकांकडून विरोध होत आहे. (Truck Drivers Unsatisfied Due To New Motor Vehicle Act)
नवीन कायदा रद्द करा अशी मागणी करत पेट्रोल डिझेल पुरवठा करणाऱ्या बीपीसीएल, एचपीसीएल, आयोसीएल कंपनीच्या टँकर चालकांनी 1 ते 3 जानेवारी 2024 असा तीन दिवसांचा संप पुकारला आहे. त्यामुळे वानचालक पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी रांगा लावून गर्दी करत आहेत. अकोला महानगर तसेच बाहेरील पंपावर देखील वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.