Home » Gondia : तिघांचा मृत्यू अंत्यदर्शनाला जाणाऱ्यांच्या गाडीला भीषण अपघात

Gondia : तिघांचा मृत्यू अंत्यदर्शनाला जाणाऱ्यांच्या गाडीला भीषण अपघात

Accident : अन्य तिघे गंभीर जखमी

by नवस्वराज
0 comment

Gondia : जैन धर्मियांचे दिगंबर पंथियाचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचे रात्रीच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघे गंभीर जखमी आहेत.

जैन धर्मीयांचे दिगंबर पंथीयांचे सर आचार्य विद्यासागर महाराज यांचे छत्तीसगडच्या डोंगरगड येथे रात्री २ वाजून ३५ मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले. मध्य प्रदेश राज्यातील रीवा जिल्ह्यातून छत्तीसगडच्या डोंगरगडकडे भाविक संत आचार्य विद्यासागर महाराज यांच्या अंत्यदर्शनाला निघाले होते. दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील पानगाव येथे गाडी अनियंत्रित झाल्याने पुजारीटोला धरणाच्या कालव्यामध्ये कोसळली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!