Home » महानगरातील ‘दोन राजांचे’, एकाच दिवशी आगमन होणार

महानगरातील ‘दोन राजांचे’, एकाच दिवशी आगमन होणार

by नवस्वराज
0 comment

अकोला : १९ सप्टेंबरला घरोघरी गणरायाचे आगमन होणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची देखिल लगबग सुरू आहे. गणेश चतुर्थीचे दिवशी रहदारीची समस्या लक्षात घेता मोठ्या गणेश मुर्ती आणणे कठीण जाते. नागरीकांची गैरसोय होऊ नये म्हणून काही मंडळ ४ – ५ दिवस आधी मुर्ती आणतात.

महानगरातील टिळक मार्गावरील ‘लालबागचा आणी दुसरा श्री वीरहनुमान चौकातील जुन्या शहराचा राजा’. दोन्ही मंडळ जुने आणि प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे दोघांचेही आगमन १६ सप्टेंबर शनिवारी होणार आहे.

लालबागचा राजा मुर्ती आगमन मिरवणूकीला सिद्धिविनायक मंदिर, जठारपेठ येथून दुपारी २ वाजता सुरूवात होईल. शहरातील विविध भागातून जात मिरवणूक टिळक रोडवरील स्थापना स्थळी पोचेल. जुन्या शहराच्या राजाची आगमन मिरवणूक सायंकाळी ५ वाजता सिटी कोतवाली जवळून निघून जयहिंद चौक मार्गे श्री वीरहनुमान चौकात पोचेल.

दोन्ही राजांचे आगमन भव्यदिव्य होणार असल्यामुळे गणेशभक्त हा सोहळा बघण्यासाठी शनिवारची वाट आतुरतेने बघत आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!